ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: अहिंसेचे सत्याग्रही : महात्मा गांधी आणि काळाच्या पलीकडला विचार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » अहिंसेचे सत्याग्रही : महात्मा गांधी आणि काळाच्या पलीकडला विचार
रत्नागिरी

अहिंसेचे सत्याग्रही : महात्मा गांधी आणि काळाच्या पलीकडला विचार

Gramin Varta
Last updated: October 2, 2026 7:57 am
Gramin Varta
42 Views
Share

रत्नागिरी: सन १९३९ मध्ये महात्मा गांधी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाइन यांनी गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेताना एक अत्यंत मार्मिक उद्गार काढले होते. ते म्हणाले होते, “येणाऱ्या पिढ्यांना कदाचित यावर विश्वास ठेवणेही कठीण जाईल की, असा हाडामांसाचा मनुष्य कधी या पृथ्वीतलावर वावरत होता!” पुढे त्यांच्या ‘Out of My Later Years’ या ग्रंथात प्रसिद्ध झालेले हे विधान केवळ एका राजकीय नेत्याची स्तुती नव्हते; तर सत्य, अहिंसा आणि नैतिक धैर्याच्या अधिष्ठानावर समाजपरिवर्तन घडवणाऱ्या एका अद्वितीय मानवाला दिलेली ती वैश्विक दाद होती. हिंसेचा लवलेश नसतानाही अन्यायाविरुद्ध आणि जगातील सर्वात मोठ्या साम्राज्यशाहीविरुद्ध लढा कसा उभारता येतो, हे गांधीजींनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. म्हणूनच १९४८ मध्ये त्यांचा देह जरी काळाच्या पडद्याआड गेला, तरी त्यांचे विचार आजही मानवी विवेकाला दिशा दाखवत ठामपणे उभे आहेत.

२ ऑक्टोबर १८६९ रोजी पोरबंदरच्या मातीत करमचंद आणि पुतळाबाई यांच्या पोटी जन्मलेले मोहनदास करमचंद गांधी हे जन्मतः कोणी अलौकिक विभूती नव्हते. एका सामान्य बालकाप्रमाणेच त्यांच्याकडूनही बालपणात चुका घडल्या. मात्र, लहानपणी केलेल्या एका चोरीची कबुली जेव्हा त्यांनी वडिलांपुढे दिली, तेव्हा वडिलांनी शिक्षा करण्याऐवजी डोळ्यांतून गाळलेले अश्रू बाल मोहनच्या अंतःकरणाला स्पर्शून गेले. या प्रसंगाने त्यांच्या मनात सत्याची अपार ताकद आणि अहिंसेची करुणामय शक्ती कायमची रुजवली. महात्मा होणे म्हणजे जन्मतः चुका न करणे नव्हे, तर स्वतःच्या चुका प्रामाणिकपणे मान्य करून त्या सुधारणे आणि निरंतर आत्मशुद्धीकडे वाटचाल करणे होय, हा आदर्श गांधीजींनी स्वतःच्या जगण्यातून निर्माण केला.

शालेय शिक्षणानंतर बॅरिस्टर पदवी संपादन करून सर्व सुखसोयी उपलब्ध असतानाही त्यांनी गरिबांच्या, शोषितांच्या न्यायाचा मार्ग निवडला. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाविरोधातील यशस्वी लढ्यानंतर त्यांनी भारतात येऊन स्वातंत्र्याची देशव्यापी लोकचळवळ उभी केली. चंपारण्य, खेडा, मीठाचा सत्याग्रह ते थेट १९४२ चे ‘भारत छोडो’ आंदोलन—त्यांच्या एका आवाहनावर संपूर्ण देश सर्वस्व अर्पण करायला सिद्ध झाला. या संपूर्ण संघर्षात त्यांनी सत्य आणि अहिंसा या मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही.

त्यांच्या या अनोख्या पद्धतीमुळे तत्कालीन ब्रिटिश सत्तेला ते अत्यंत आव्हानात्मक वाटले. ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी त्यांची खिल्ली उडवत त्यांना ‘नंगा फकीर’ (Naked Fakir) असे संबोधले; तरीही लंडनच्या गोलमेज परिषदेत जाताना त्यांनी आपली वेशभूषा आणि भूमिकेतील साधेपणा तसूभरही बदलला नाही. त्यांच्या अहिंसेची व्यापकता केवळ देशापुरती मर्यादित नव्हती. दुसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर, रक्ताचे पाट वाहणाऱ्या हुकूमशहा अ‍डॉल्फ हिटलरलाही त्यांनी पत्र लिहून ‘Dear Friend’ अशी साद घातली आणि युद्ध मानवाला पुन्हा रानटी युगात नेईल, असा इशारा देत शांततेचे आवाहन केले. विरोधकाला शत्रू न मानता त्याच्या सुप्त विवेकाला जागे करणे, हीच गांधीजींच्या अहिंसेची खरी ताकद होती.

गांधीजींच्या जीवनप्रवासात त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाली. काहींना त्यांची अहिंसा अतिशय मवाळ वाटली, तर काहींना ती टोकाची संघर्षात्मक वाटली. देशाच्या फाळणीचे दुःखद वास्तव समोर आले, तेव्हा अनेकांनी त्याचा दोष गांधीजींवर लादला; तरीही त्यांनी कधीही टीकेला वैयक्तिक वैराचे स्वरूप दिले नाही. गांधीजींच्या विचारसरणीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे—त्यांनी ‘विरोधक’ आणि ‘शत्रू’ यांतील भेद सदैव जपला. “माझे सत्य हे अंतिम सत्य नसून, सत्याचा अविरत शोध घेण्याचा माझा प्रयत्न आहे,” अशी त्यांची धारणा होती. त्यामुळेच ते हट्टी नव्हते, तर तत्त्वांवर ठाम होते.

आजच्या काळात, जिथे सोशल मीडियाच्या माध्यमातून क्षणात गैरसमज, द्वेष आणि व्यक्तिगत चिखलफेक पसरवली जाते, तिथे गांधीविचारांची प्रासंगिकता अधिकच तीव्रतेने जाणवते. आरोपांना क्रोधाने उत्तर देण्याऐवजी सत्य पारखणे, विरोधकांशी संवाद साधणे आणि जमावाच्या आरडाओरडीपेक्षा स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीशी प्रामाणिक राहणे, ही आजच्या पिढीसाठी सर्वात मोठी शिकवण आहे.

३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींच्या नश्वर देहावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतरही दशकानुदशके त्यांच्या विचारांची, चारित्र्याची आणि जीवनकार्याची शाब्दिक हेटाळणी करण्याचे प्रयत्न झाले. परंतु, व्यक्तीला गोळीने संपवता आले तरी सत्य, अहिंसा, करुणा, सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता या शाश्वत मूल्यांना कधीही नष्ट करता येत नाही. गैरसमजांच्या आणि विद्वेषाच्या वादळातही मानवी मूल्यांवर अविचल राहण्याची ही शिकवण आजच्या जगाला खरी दिशा देणारी ठरते. अहिंसेच्या या महान सत्याग्रही महात्म्याला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

लेखक : श्री. माधव रतनबाई विश्वनाथ अंकलगे वाटद खंडाळा, पो. वाटद, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३ संपर्क : ९७६४८८६३३० / ९०२१७८५८७४

Total Visitors :

5469324
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

पुण्याच्या प्रतिष्ठित मॅरेथॉनमध्ये गुहागरच्या अनंत तानकरांची ऐतिहासिक कामगिरी; २१ किमी शर्यतीत पटकावला द्वितीय क्रमांक

Gramin Varta
1 Min Read

CTET परीक्षेच्या तारखेत बदल; १२ आणि १३ डिसेंबरला परीक्षा, प्रवेशपत्र दोन दिवस आधी मिळणार

Gramin Varta
3 Min Read

NMMS परीक्षेत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या यशाचे उद्दिष्ट; लांज्यात उद्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा

Gramin Varta
2 Min Read

चांदीचे दर गडगडले; किलोमागे १३,२०० रुपयांची घसरण

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

तरवळ जाधववाडीत ग्रामस्थांनी उभारला श्रमदानातून वनराई बंधारा; दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी एकजूट

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मच्छिमारांचे प्राण वाचवणाऱ्या ७ जणांचा सत्कार

2 Min Read
रत्नागिरी

पोलीस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरीत हुतात्मा जवानांना मानवंदना; कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या १५४ शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली

1 Min Read
रत्नागिरी

कळझोंडी उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ६२ ग्रामस्थांनी घेतला लाभ

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?