ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कळझोंडी उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ६२ ग्रामस्थांनी घेतला लाभ
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कळझोंडी उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ६२ ग्रामस्थांनी घेतला लाभ
रत्नागिरी

कळझोंडी उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ६२ ग्रामस्थांनी घेतला लाभ

Gramin Varta
Last updated: September 17, 2026 10:43 am
Gramin Varta
4 Views
Share

रत्नागिरी: श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी उपकेंद्र येथे ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ अंतर्गत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने आयोजित या शिबिरामध्ये ६२ रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी करून आवश्यक औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात आले.

मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश डोके आणि आरोग्य सहाय्यक परशुराम निवेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. या उपक्रमादरम्यान नागरिकांचे वजन, उंची, रक्तदाब आणि रक्तातील साखर तपासण्यात आली. यासोबतच इतर आवश्यक रक्त तपासण्या, नियमित लसीकरण आणि पात्र लाभार्थ्यांना ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’चे वाटप करण्यात आले. दैनंदिन जीवनात आरोग्य तपासणीचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैली यावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सविस्तर समुपदेशन केले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश डोके यांनी कळझोंडी उपकेंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन शिबिराच्या कामकाजाची पाहणी केली व आरोग्य पथकाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य सहाय्यिका सीमा पाडवी, समुदाय आरोग्य अधिकारी अक्षता नंदकुमार शिर्सेकर, आरोग्य सेविका डी. एस. गावडे, आरोग्य सेवक एस. एन. अंबुरे, आशा स्वयंसेविका साक्षी सुहास पवार, निशा मुकुंद वीर आणि मदतनीस नम्रता सिद्धार्थ पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी समुदाय आरोग्य अधिकारी अक्षता शिर्सेकर यांनी वैद्यकीय अधिकारी व सहकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले. ग्रामीण भागात आरोग्य जनजागृती निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

Total Visitors :

5427500
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Innovations Redefining the Landscape of Transportation Technology

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

Embracing Change Key Milestones in the Current Evolution Era

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

रत्नागिरीत हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघे ताब्यात; १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
2 Min Read

टीईटी पेपरफुटी : ठाणे पोलिसांकडून 18 आरोपींविरुद्ध 3,500 पानांचे दोषारोपपत्र

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीत गांजाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; २ किलो गांजासह एकाला अटक

2 Min Read
रत्नागिरी

Latest Trends and Insights in Shaping Industries for the Future

रत्नागिरी

११,५०० फुटांवर रत्नागिरीचा झेंडा; अभिजित पड्याळ यांची लडाख मॅरेथॉन ५ तास २२ मिनिटांत पूर्ण

2 Min Read
रत्नागिरी

मजगावच्या इब्जी कुटुंबाचा शैक्षणिक वारसा कायम; तीन डॉक्टरांनंतर सलमा इब्जीचे नर्सिंग क्षेत्रात यश

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?