ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी : विद्यार्थिदशेतच नशेपासून दूर राहा – अरांक्षा यादव
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी : विद्यार्थिदशेतच नशेपासून दूर राहा – अरांक्षा यादव
रत्नागिरी

रत्नागिरी : विद्यार्थिदशेतच नशेपासून दूर राहा – अरांक्षा यादव

Gramin Varta
Last updated: October 3, 2026 8:59 am
Gramin Varta
24 Views
Share

रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी विद्यार्थिदशेतच नशेपासून दूर राहायला शिकायला हवे, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अरांक्षा यादव यांनी केले.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात नशामुक्ती अभियानाअंतर्गत खातू नाट्यमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

विद्यार्थ्यांनी विद्यार्थिदशेतच आपले ध्येय निश्चित करावे. या वयातच योग्य निर्णय घेतलात तर तुमचे आयुष्य चांगले होणार आहे. अनेकदा मित्रमैत्रिणी सांगतात एकदा नशा करून बघ, त्याच वेळी आपण नकार दिला पाहिजे. कारण त्यावेळी होकार दिला तर आपले हे चुकीचे पाऊल तुमचे सर्व आयुष्य वाया घालवू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सजग राहावे, सतर्क राहावे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी अरांक्षा यादव यांनी नशामुक्तीसंदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास पोलिस मुख्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन केले. आपण व्यसन करायचे नाही व आपल्या संपर्कातील लोकांनी करू नये यासाठी जनजागृती करावी, असे सांगितले. मी मूळची हरियाणाची असून आयपीएस झाल्यावर माझे पहिले पोस्टिंग रत्नागिरीत झाल्याचे यादव म्हणाल्या. त्यांनी विद्यार्थ्यांची मोठी बहीण असल्याप्रमाणे सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. नशेपासून दूर राहण्याचा प्रेमळ सल्ला त्यांनी दिला.कार्यक्रमाला १५०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे म्हणाले की, नशा करणे हा आपल्या समस्येवरचा उपाय नसतो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी आपण आपले कुटुंबीय, मित्र मैत्रिणी, शिक्षक किंवा कोणीही जवळच्या व्यक्तीबरोबर संवाद साधून सोडवल्या पाहिजेत. त्यामुळे आपण नशेपासून दूर राहू शकतो.प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिली. सर्व विद्यार्थ्यांनी नशामुक्तीची प्रतिज्ञा घेऊन व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचा संकल्प केला.कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे व्यसनमुक्तीसंदर्भात जनजागृती केली. स्वयंसेवकांनी प्रभावी पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जागृती निर्माण केली व नशामुक्त जीवनाचा संदेश दिला.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दुष्काळग्रस्त यादीबाहेरील शेतकऱ्यांनाही मदत देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Gramin Varta
3 Min Read

कारवली गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माजी सरपंच गणेश वरेकर यांची बिनविरोध निवड

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरी एसटीच्या ताफ्यात १५० नव्या स्मार्ट बसेस दाखल होणार; खिळखिळ्या गाड्यांच्या जागी अत्याधुनिक जिजाऊ बसेस धावणार

Gramin Varta
2 Min Read

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणात ७० वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या संशयिताला ३ दिवसांची पोलीस कोठडी

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : कोकणनगर येथे रेशन धान्याचे सुरळीत वितरण; ९८ टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले धान्य

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत सागरी सीमा मंचातर्फे स्वच्छ सागर अभियान

3 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : लॉजच्या आवारातील क्रूझर पेटवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?