संगमेश्वर : रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल रत्नागिरी येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय शासकीय बास्केटबॉल स्पर्धेत अजीजा दाऊद नाईक हायस्कूलच्या १४ वर्षाखालील मुले आणि १७ वर्षाखालील मुले या दोन्ही संघानी प्रथम क्रमांक मिळवला व हे दोन्ही संघ वारणानगर कोल्हापूर येथे होणा-या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.तसेच १४ वर्षाखालील मुली आणि १७ वर्षांखालील मुली यांनी उपविजेतेपद पटकावले.
सर्व खेळाडूंनी उत्तम खेळाचे प्रदर्शन केले.विजयी संघ आणि मार्गदर्शक मैनुद्दिन भैरेवाडी व शाहनवाज राजापकर यांचे आयडीयल एज्युकेशन ॲन्ड वेल्फेअर सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक समीर गडबडे पर्यवेक्षिका रईसा मुजावर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या सर्व संघांचे अभिनंदन करून वारणानगर कोल्हापूर येथे होणा-या पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




