ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर बाजारपेठ रस्त्यावर बेकायदा मासळी विक्री आणि अस्वच्छता; नाटे येथील ६ महिला विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर बाजारपेठ रस्त्यावर बेकायदा मासळी विक्री आणि अस्वच्छता; नाटे येथील ६ महिला विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
राजापूर

राजापूर बाजारपेठ रस्त्यावर बेकायदा मासळी विक्री आणि अस्वच्छता; नाटे येथील ६ महिला विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: October 7, 2026 11:08 am
Gramin Varta
152 Views
Share

राजापूर : राजापूर शहरातील सार्वजनिक रस्त्यावर नियमबाह्यरीत्या मासळी विक्री करून दुर्गंधी पसरवणाऱ्या नाटे येथील सहा महिलांवर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता पथकाने मंगळवारी सकाळी ही कारवाई केली.

शहरातील शिवाजी पथ ते मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावर महालक्ष्मी हॉटेलसमोर काही महिला रस्त्यावरच मासे विक्री करत असल्याच्या तक्रारी नगर परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अमित मोहन पोवार, स्वच्छता मुकादम राजन रामचंद्र जाधव आणि सफाई कर्मचारी संदेश नाना जाधव हे संयुक्त पथक संबंधित ठिकाणी पाहणीसाठी गेले. त्या वेळी रस्त्यावर अनधिकृतपणे मासळी विक्री सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

संबंधित महिला रस्त्यावरच माशांची खवले आणि घाण पाणी टाकत असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती, तसेच पादचाऱ्यांना ये-जा करणे अवघड झाले होते. सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणल्याप्रकरणी नगर परिषदेचे मुकादम राजन जाधव यांनी राजापूर पोलिसांत फिर्याद नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी सादिका फणसोपकर, शाहिन फणसोपकर, अक्सा समीर सोलकर, नाजिया वाडकर, अनिसा रशिद सोलकर आणि सुमय्या बोरकर (सर्व रा. नाटे, ता. राजापूर) यांच्याविरोधात महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम २६७, २६९ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5469300
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दापोली : केळशी येथील बँक खात्यातून सुमारे चार लाखांची ऑनलाईन फसवणूक

Gramin Varta
1 Min Read

गोवळ-विल्ये दरम्यान अर्जुना नदीवरील मोठ्या पुलासाठी २५ कोटींचा निधी मंजूर; खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला यश

Gramin Varta
1 Min Read

कळझोंडी उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ६२ ग्रामस्थांनी घेतला लाभ

Gramin Varta
2 Min Read

निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा वर्तक कुटुंबीयांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव देखावा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

व्हॉट्सॲपवरील आक्षेपार्ह पोस्टवरून राजापूर-रत्नागिरीत वाद पेटला; बदनामी आणि मारहाणीप्रकरणी दोन्ही बाजूंवर गुन्हे दाखल

3 Min Read
राजापूर

राजापूर: महायुती सरकार शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी; गावागावांत वनराई बंधारे बांधून दुष्काळावर मात करूया : आमदार निलेश राणे

2 Min Read
राजापूर

पाचलच्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकच्या परिसरात दोन बिबट्यांचा वावर? वनविभागाला कळवूनही अधिकारी फिरकले नाहीत; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

2 Min Read
राजापूर

अर्जुना धरणाच्या टेल चॅनेल खालील पाचल-तळवडे पुलाच्या बांधकामास मंजुरी; आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश, जामदा खोऱ्यातील नागरिकांत समाधान

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?