ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: सौदी अरेबियातील भारतीयांसाठी नवी मार्गदर्शक सूचना
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » सौदी अरेबियातील भारतीयांसाठी नवी मार्गदर्शक सूचना
देश-विदेश

सौदी अरेबियातील भारतीयांसाठी नवी मार्गदर्शक सूचना

Gramin Varta
Last updated: October 14, 2026 8:32 am
Gramin Varta
161 Views
Share

अनेक शहरांतील विमानसेवा 17 ऑक्टोबरपर्यंत स्थगित

दिल्ली: सौदी अरेबियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रियाध येथील भारतीय दूतावासाने मंगळवारी भारतीय नागरिकांसाठी नवी मार्गदर्शक सूचना जारी केली.

काही भारतीय विमान कंपन्यांनी सौदी अरेबियातील प्रमुख शहरांसाठीची विमानसेवा 17 ऑक्टोबरपर्यंत स्थगित केल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन दूतावासाने केले आहे.

भारतीय दूतावासाने नागरिकांना शांत राहण्याचा आणि सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. हवाई हल्ल्यांची परिस्थिती उद्भवल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने घराच्या किंवा इमारतीच्या आत राहावे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून अधिकृत माध्यमांतून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे दूतावासाने स्पष्ट केले आहे.याशिवाय, सध्या सुरू असलेल्या घटनांशी संबंधित व्हिडिओ, छायाचित्रे किंवा बातम्या पडताळणी न करता प्रसारित अथवा पुन्हा शेअर करू नयेत, असे आवाहनही भारतीय नागरिकांना करण्यात आले आहे.

अनेक शहरांसाठी विमानसेवा स्थगित

दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस यांनी १७ ऑक्टोबरपर्यंत रियाध, दम्माम आणि जेद्दा या शहरांसाठीची उड्डाणे स्थगित केली आहेत.अकासा एअरने रियाध आणि जेद्दासाठीची विमानसेवा स्थगित केली आहे. तर इंडिगोने रियाध, दम्माम, जेद्दा आणि मदिना या शहरांसाठीची उड्डाणे १७ ऑक्टोबरपर्यंत रद्द केली आहेत.या निर्णयांमुळे सौदी अरेबियात प्रवास करणाऱ्या तसेच भारतात परतण्याची तयारी करणाऱ्या प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन बदलावे लागू शकते.

रियाध विमानतळाचे कामकाज स्थगित

सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (जीएसीए) रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाज स्थगित केल्याची घोषणा केल्याचे वृत्त आहे.दरम्यान, दम्माम, जेद्दा आणि मदिना यांसारख्या अन्य प्रमुख शहरांतील विमानतळांचे कामकाज सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या विमानतळांवरून होणाऱ्या काही उड्डाणांमध्येही व्यत्यय येत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

प्रवाशांनी प्रवासापूर्वी माहिती तपासावी

सौदी अरेबियातील भारतीय नागरिकांनी विमान प्रवासापूर्वी संबंधित विमान कंपनीकडून आपल्या उड्डाणाची सद्यस्थिती तपासावी. तसेच भारतीय दूतावास आणि स्थानिक प्रशासनाकडून जारी होणाऱ्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.विमानसेवेबाबतची परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळाकडे रवाना होण्यापूर्वी आपल्या विमान कंपनीशी संपर्क साधून उड्डाणाची पुष्टी करून घ्यावी.

Total Visitors :

5468707
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू,दुसरा गंभीर जखमी

Gramin Varta
2 Min Read

राज ठाकरेंकडून अदानींवरील डॉक्युमेंट्रीची पोस्ट डिलीट

Gramin Varta
4 Min Read

खडपोली पुलाचे काम अंतिम टप्प्यात; जानेवारीपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार

Gramin Varta
1 Min Read

कुंभार्ली घाटातील खड्डे आठ दिवसांत बुजवा; अन्यथा काम बंद पाडू!

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

केंद्राकडून १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या ‘फ्लेक्स-फ्युएल’ वाहनांना अधिकृत मंजुरी

2 Min Read
देश-विदेश

कॅनडात विमान प्रशिक्षणादरम्यान अपघात; दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

2 Min Read
देश-विदेश

भारतात पहिल्यांदाच ऐतिहासिक नोंद; आसामच्या दिब्रू-सैखोवा राष्ट्रीय उद्यानात आढळली दुर्मीळ परजीवी गांधीलमाशीची अज्ञात प्रजाती

2 Min Read
देश-विदेश

एसआयआरवर सीडब्ल्यूसीने उपस्थित केले प्रश्न; प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी

4 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?