ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रात्रीस खेळ चाले! कोकणातील डोंगररांगांमध्ये बेकायदा वृक्षतोडीचा हैदोस; वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रात्रीस खेळ चाले! कोकणातील डोंगररांगांमध्ये बेकायदा वृक्षतोडीचा हैदोस; वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
खेड

रात्रीस खेळ चाले! कोकणातील डोंगररांगांमध्ये बेकायदा वृक्षतोडीचा हैदोस; वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Gramin Varta
Last updated: October 14, 2026 5:03 pm
Gramin Varta
85 Views
Share

खेड : कोकणातील जैवविविधतेने नटलेल्या डोंगररांगा आणि घनदाट जंगलांवर सध्या बेकायदा वृक्षतोड करणाऱ्या लाकूड तस्करांचे कुऱ्हाडसत्र वेगाने सुरू असून, या गंभीर प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील नांदगाव ते पन्हाळजे परिसरात दिवसाढवळ्या मौल्यवान झाडांची कत्तल केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. दुसरीकडे दापोली तालुक्यातील टेटवली, वाकवली, पिसई आणि कोंडे परिसरामध्ये रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत रात्री उशिरापर्यंत सागाच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर अवैध तोड सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्थानिक पातळीवर हे प्रकार उघडपणे सुरू असतानाही संबंधित वन विभाग मात्र पूर्णपणे काणाडोळा करत असल्याचा आरोप होत असून, वन विभागाच्या कार्यक्षमतेवरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेड आणि दापोली परिसरासह संपूर्ण कोकणात लाकूडमाफिया आणि नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारांचे एक मोठे जाळे सक्रिय झाले आहे. स्थानिक शेतकरी तसेच निष्पाप जमीनमालकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या जमिनीवरील मौल्यवान झाडे तोडण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. तोडण्यात आलेले हे सागासारखे महागडे लाकूड ठरावीक लाकूड चक्क्यांवर (सॉ मिल) नेऊन उतरवले जाते आणि तेथेच पडद्यामागून मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार पार पडत असल्याची उघड चर्चा सुरू आहे.

कोकणातील ही जंगलसंपदा केवळ लाकडाचा स्रोत नसून ती डोंगरउतारांवरील मातीची धूप रोखण्यासाठी, पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि डोंगरांची नैसर्गिक स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ढाल ठरते. अशा संवेदनशील डोंगराळ भागात बेसुमार वृक्षतोड झाल्याने डोंगरउतारांची नैसर्गिक पकड सैल होत असून, अतिवृष्टीच्या काळात विनाशकारी भूस्खलनाचा (लँडस्लाइड) धोका कैक पटीने वाढला आहे. सन २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यातील माळीण गावात घडलेली भीषण भूस्खलनाची दुर्घटना आजही संपूर्ण महाराष्ट्राच्या अंगावर काटा आणणारी ठरते, ज्यामध्ये मानवी हस्तक्षेप आणि बेसुमार जंगलतोडीचे अत्यंत भयावह परिणाम समोर आले होते. कोकणातील अनियंत्रित वृक्षतोड, डोंगरांचे उत्खनन आणि रस्त्यांच्या कामांसाठी निसर्गावर होणारा आघात भविष्यात अशाच एखाद्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला निमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे वन प्रशासनाने तात्काळ गांभीर्याने पावले उचलून या सर्व अवैध वृक्षतोडीच्या तक्रारींची सखोल व निःपक्ष चौकशी करावी, वृक्षतोडीच्या बनावट परवानग्यांची काटेकोर तपासणी करावी आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या या लाकूड तस्करांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आता संपूर्ण कोकणातून जोर धरू लागली आहे.

Total Visitors :

5468475
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी व वाढदिवस साजरा न करण्याचा ॲड. वैभव खेडेकर यांचा निर्णय

Gramin Varta
2 Min Read

टाटा एरिस सेडान भारतात लाँच

Gramin Varta
2 Min Read

एनसीसी कॅडेट्सचे ‘प्री-मेन्यू’ खडतर प्रशिक्षण संपन्न; २५० किमीच्या ‘मेन्यू २७’ सागरी नौकावहन मोहिमेसाठी ६० कॅडेट्स सज्ज

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरी : बगदादी चौकातील पान दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; गुटखा व पानमसाला जप्त

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

खेड

लोटे एमआयडीसीतील एम.आर. स्पेशालिटी केमिकल्स कंपनीत भीषण आग; लाखो रुपयांची वित्तहानी, वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे नागरिकांत संताप

1 Min Read
खेड

स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकऱ्या न दिल्यास कंपन्यांना जाब विचारणार: ॲड. वैभव खेडेकर यांचा इशारा

2 Min Read

खेडमध्ये बांधकाम साइटवरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

1 Min Read
खेड

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मुरडे परिसरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा खेडमध्ये गौरव

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?