ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या संरक्षणासाठी ग्रामपंचायतींची भूमिका अधिक बळकट होणार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या संरक्षणासाठी ग्रामपंचायतींची भूमिका अधिक बळकट होणार
देश-विदेश

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या संरक्षणासाठी ग्रामपंचायतींची भूमिका अधिक बळकट होणार

Gramin Varta
Last updated: October 15, 2026 9:17 am
Gramin Varta
40 Views
Share

दिल्ली : ‘जल जीवन मिशन २.०’ अंतर्गत ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची दीर्घकालीन सुरक्षा आणि पाणीपुरवठा यंत्रणांची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार ग्रामपंचायतींची भूमिका अधिक बळकट करणार आहे.

हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, ‘जल जीवन मिशन २.०’ ची सांगड ‘विकसित ग्राम रोजगार एवं आजीविका हमी कार्यक्रम’ (वीबी-जी राम जी) सोबत घातली जाईल. केंद्र आणि राज्यांमधील या समन्वयामुळे भूजल पुनर्भरण, पावसाच्या पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे जतन यांशी संबंधित उपक्रमांना वैज्ञानिक आधारावर प्राधान्य देणे शक्य होईल.

बुधवारी, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘पेयजल आणि स्वच्छता विभागाने’, ‘जल-विषयक विभागीय शिखर परिषद-२०२६’ नंतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत तिसरी आभासी (व्हर्च्युअल) परिषद आयोजित केली. या परिषदेत पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता, जलसुरक्षा आणि ग्रामपंचायतींच्या नेतृत्वाखालील योजनांची आखणी यांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव अशोक के.के. मीना यांनी नमूद केले की, ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याशी संबंधित पायाभूत सुविधांचा विस्तार झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात या सुविधांची दीर्घकालीन उपयुक्तता, विश्वासार्हता आणि देखभाल सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला.

मीना यांनी सांगितले की, पिण्याच्या पाणीपुरवठा सेवा शाश्वत करण्यासाठी जलस्रोतांचे जतन, पुनर्भरण आणि नियमित देखभाल करणे आवश्यक आहे. ‘विकसित ग्राम रोजगार एवं आजीविका हमी कार्यक्रमां’तर्गत जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या देखभालीशी संबंधित उपक्रम राबवले जाऊ शकतात. त्यांनी राज्यांना आवाहन केले की, त्यांनी ‘जल जीवन मिशन’च्या ‘ग्राम कृती योजना’ आणि ‘स्रोत शाश्वतता योजना’ यांचा ‘विकसित ग्राम पंचायत योजना’ आणि ‘ग्राम पंचायत विकास योजनां’शी समन्वय साधावा.

त्यांनी नमूद केले की, जलसुरक्षेशी संबंधित उपक्रम हे स्थानिक जलस्रोतांच्या वैज्ञानिक मूल्यांकनावर आधारित निश्चित केले जावेत. ग्रामसभेच्या मान्यतेने या योजनांची अंमलबजावणी केल्यास लोकसहभाग आणि उत्तरदायित्व वाढेल. ग्रामपंचायती, ग्राम पाणी व स्वच्छता समित्या आणि स्थानिक संस्थांकडे जलस्रोत, ऋतूंनुसार होणारे बदल आणि स्थानिक गरजांबाबतची माहिती उपलब्ध असते; त्यामुळे नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख या प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सहाय्यक आयुक्त दीक्षा एस. बिश्त यांनी सांगितले की, ‘विकसित ग्राम रोजगार एवं आजीविका हमी कार्यक्रम’ अंतर्गत जलसुरक्षेशी संबंधित १२८ प्रकारच्या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाऊ शकते. यामध्ये भूजल पुनर्भरण, पावसाच्या पाण्याचे संकलन (रेनवॉटर हार्वेस्टिंग), पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापन, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे जतन आणि जल-संबंधित मालमत्तेची देखभाल यांसारख्या कामांचा समावेश आहे. पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये भूजलाची स्थिती आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन उपक्रमांना प्राधान्य देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

ओडिशाने भूजल पुनर्भरण, घरगुती सांडपाणी व्यवस्थापन, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, जलस्रोत संवर्धन आणि हवामान-लवचिक जल-पायाभूत सुविधांबाबतचे आपले अनुभव मांडले. मध्य प्रदेशने ग्रामीण पाणीपुरवठा योजना आणि पावसाच्या पाणी संकलनाशी संबंधित यंत्रणांच्या देखभालीमध्ये ग्रामपंचायतींच्या भूमिकेबाबत माहिती दिली. राजस्थानने ग्रामीण पाणीपुरवठा पायाभूत सुविधांची प्रतिबंधात्मक, सुधारात्मक आणि आपत्कालीन देखभाल सुनिश्चित करण्यासाठी ‘विकसित ग्राम रोजगार एवं आजीविका हमी कार्यक्रमा’शी समन्वय साधण्याबाबतची रूपरेषा सादर केली.

राष्ट्रीय जल जीवन मिशनचे उप-सल्लागार सुमित प्रियदर्शी यांनी ‘निर्णय सहाय्य प्रणाली’च्या वापराबाबत सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, ही प्रणाली पाण्याची गुणवत्ता आणि उपलब्धता यांशी संबंधित धोक्यांचा सामना करणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची ओळख पटवण्यास मदत करते. राज्यांना सांगण्यात आले की त्यांनी उपलब्ध माहितीच्या आधारे धोक्याच्या छायेत असलेली गावे आणि वस्त्यांची ओळख पटवावी, प्रत्यक्ष पाहणीद्वारे या धोक्यांची पडताळणी करावी आणि सुधारात्मक उपाययोजनांच्या परिणामांवर देखरेख ठेवावी.

राष्ट्रीय जल जीवन मिशनचे अतिरिक्त सचिव आणि मिशन संचालक कमल किशोर सोन यांनी सांगितले की, ‘विकसित ग्राम रोजगार एवं आजीविका हमी कार्यक्रमां’तर्गत केलेली गुंतवणूक ही ‘निर्णय सहाय्य प्रणाली’द्वारे ओळखल्या गेलेल्या पिण्याच्या पाण्याशी संबंधित आव्हानांचे निराकरण करण्यावर केंद्रित असावी. जल-संबंधित उपक्रमांवर होणारा खर्च हा जलसुरक्षेमध्ये मोजण्यायोग्य सुधारणा घडवून आणणारा असावा, यावर त्यांनी भर दिला.

Total Visitors :

5470250
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेत दापोलीच्या ईगल स्केटर्स क्लबचा सुवर्ण डंका; मुक्ता गोविलकर आणि आराध्या पाटणेची विभागीय फेरीत धडक

Gramin Varta
1 Min Read

गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास होणार सुकर; गृहराज्यमंत्र्यांच्या पुढाकारातून ‘खेड-दिवा’ मेमू स्पेशल धावणार मोफत

Gramin Varta
2 Min Read

अंजनवेल येथील कोकण एलएनजी जेटीजवळ समुद्रात पडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना आवाहन

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

सौदी अरेबियातील भारतीयांसाठी नवी मार्गदर्शक सूचना

2 Min Read
देश-विदेश

दागिने खरेदी करताना गुलाबी कागदच का वापरतात? काय आहे या मागच खरं कारण!

1 Min Read
देश-विदेश

आकाशाला गवसणी घालणारे अतुलनीय शौर्य; भारतीय लष्कराच्या जांबाज श्वानाची पॅराशूटसह ऐतिहासिक झेप

2 Min Read
देश-विदेश

स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी मोठा निर्णय; निकृष्ट ‘टेंपर्ड ग्लास’च्या विक्रीला चाप

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?