ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: गरबा महोत्सवातून पळवलेल्या पाच वर्षीय बालकाची २४ तासांत सुटका; ८०० किमी पाठलाग करत पोलिसांनी आरोपी महिलेला ठोकल्या बेड्या
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » गरबा महोत्सवातून पळवलेल्या पाच वर्षीय बालकाची २४ तासांत सुटका; ८०० किमी पाठलाग करत पोलिसांनी आरोपी महिलेला ठोकल्या बेड्या
महाराष्ट्र

गरबा महोत्सवातून पळवलेल्या पाच वर्षीय बालकाची २४ तासांत सुटका; ८०० किमी पाठलाग करत पोलिसांनी आरोपी महिलेला ठोकल्या बेड्या

Gramin Varta
Last updated: October 21, 2026 9:07 am
Gramin Varta
266 Views
Share

अमरावती: शहरातील गरबा महोत्सवातून अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर, अमरावती शहर पोलिसांनी अत्यंत वेगवान हालचाली करत २४ तासांच्या आत गुन्ह्याचा छडा लावला. तब्बल ८०० किलोमीटरचा खडतर पाठलाग करून पोलिसांनी अपहृत बालकाला सुखरूप ताब्यात घेत विजयादशमीच्या पावन मुहूर्तावर त्याच्या आईच्या कुशीत सोपवले, तर अपहरणकर्त्या संशयित महिलेला गजाआड केले. पोलिसांच्या या तत्पर आणि संवेदनशील कामगिरीमुळे खाकी वर्दीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

साबनपुरा येथील रहिवासी श्रेजा या १९ ऑक्टोबर रोजी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओसवाल भवन येथे आयोजित गरबा महोत्सवात आपल्या पाच वर्षांच्या मुलासह गेल्या होत्या. त्या गरबा पाहण्यात मग्न असताना एका अज्ञात महिलेने संधी साधून चिमुकल्याला फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस आणि गुन्हे शाखेची तब्बल १० विशेष तपास पथके तातडीने रवाना करण्यात आली. परिसरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, एका लाल रंगाची साडी नेसलेली महिला बालकाला घेऊन घाईघाईने जात असल्याचे स्पष्ट दिसले. बसस्थानक, रेल्वे स्टेशन आणि ऑटोरिक्षा स्टँडवर कसून चौकशी केल्यानंतर ती महिला अमरावती रेल्वे स्टेशन चौकातून हमलपुरा परिसराच्या दिशेने गेल्याची गोपनीय माहिती पोलिसांच्या हाती लागली.

तांत्रिक तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी शोध घेतला असता संशयित महिला अमरावतीतून थेट गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे पळून गेल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक आमगाव पोलिसांच्या सहकार्याने अमरावतीच्या पोलीस पथकाने एकाच रात्रीत ८०० किलोमीटरचा थरारक प्रवास पूर्ण करत आरोपी महिलेच्या मुसक्या आवळल्या आणि चिमुकल्याची सुरक्षित सुटका केली. गुन्हे शाखाप्रमुख दिनेश दहातोंडे, अतुल वर आणि राजापेठचे पोलीस निरीक्षक वैभव पानसरे यांच्या संयुक्त पथकाने विजयादशमीच्या दिवशी एका मातेचे अश्रू पुसत ही कौतुकास्पद कामगिरी यशस्वीरीत्या फत्ते केली.

Total Visitors :

5469381
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दापोलीत कोट्यवधींच्या वक्फ जमीन घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई; सत्ताधारी राजकीय नेत्यासह ४४ जणांना वक्फ बोर्डाची नोटीस

Gramin Varta
3 Min Read

तृणमूल काँग्रेसचे नाव व निवडणूक चिन्ह गोठवले; ममता -ऋतब्रत गटांकडून निवडणूक आयोगाकडे पर्यायी नावे सादर

Gramin Varta
4 Min Read

एका सेकंदात ५९२ वेळा फिरणाऱ्या न्यूट्रॉन ताऱ्याचे महाकाय रेडिओ पल्सेस शोधले

Gramin Varta
3 Min Read

देवरुख-संगमेश्वर-साखरपा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आमदार का बोलत नाहीत? गाव विकास समितीचे जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांचा सवाल

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान मराठी साहित्य संमेलन- मराठी भाषा मंत्री उदय सामंत

3 Min Read
महाराष्ट्र

‘अनुष्का… थांब!’ मैत्रिणींचा आक्रोश हवेतच विरला; कानात इअरबड्स घालून रुळावरून चालणाऱ्या विद्यार्थिनीला एक्स्प्रेसची जोरदार धडक

2 Min Read
महाराष्ट्र

प्रदीप पूर्णेकर हत्याकांड प्रकरणी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पतीची सलग आठ तास कसून चौकशी; एसआयटी ॲक्शन मोडवर

2 Min Read
महाराष्ट्र

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘द वन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?