ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘अनुष्का… थांब!’ मैत्रिणींचा आक्रोश हवेतच विरला; कानात इअरबड्स घालून रुळावरून चालणाऱ्या विद्यार्थिनीला एक्स्प्रेसची जोरदार धडक
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘अनुष्का… थांब!’ मैत्रिणींचा आक्रोश हवेतच विरला; कानात इअरबड्स घालून रुळावरून चालणाऱ्या विद्यार्थिनीला एक्स्प्रेसची जोरदार धडक
महाराष्ट्र

‘अनुष्का… थांब!’ मैत्रिणींचा आक्रोश हवेतच विरला; कानात इअरबड्स घालून रुळावरून चालणाऱ्या विद्यार्थिनीला एक्स्प्रेसची जोरदार धडक

Gramin Varta
Last updated: September 24, 2026 8:08 am
Gramin Varta
276 Views
Share

हातकणंगले (प्रतिनिधी): कानामध्ये ब्लूटूथ इअरबड्स घालून रेल्वे रुळावरून चालणे एका १७ वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना हातकणंगले ग्रामीण रुग्णालयासमोरील रेल्वे मार्गावर बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. वेगाने येणाऱ्या धनबाद एक्स्प्रेसच्या भीषण धडकेत अनुष्का संतोष पोवार (वय १७, रा. सुतार मळा, इचलकरंजी) ही विद्यार्थिनी जागीच ठार झाली. अवघ्या काही पावलांवर असलेल्या वर्गमैत्रिणींनी तिला वाचवण्यासाठी जिवाच्या आकांताने घातलेल्या सादाला कानातील इअरबड्समुळे प्रतिसाद मिळू शकला नाही आणि डोळ्यांदेखत घडलेल्या या अंगावर काटा आणणाऱ्या भीषण दृश्याने दोन मैत्रिणी घटनास्थळीच बेशुद्ध पडल्या. या दुर्दैवी दुर्घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोरोची येथे आरोग्य परिचरचे (नर्सिंग) शिक्षण घेणारी अनुष्का आपल्या दोन वर्गमैत्रिणींसह हातकणंगले ग्रामीण रुग्णालय परिसरातील मैत्रिणींच्या भेटीसाठी आली होती. आनंदात वेळ घालवण्यासाठी निघालेल्या या तिघींपैकी अनुष्का रेल्वे रुळावरून पुढे चालत होती, तर तिच्या दोन्ही मैत्रिणी वीस-तीस फूट मागे चालत होत्या. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने धनबाद एक्स्प्रेस येत असल्याचे पाहून मागून येणाऱ्या मैत्रिणींनी ‘अनुष्का… थांब!’ असा आक्रोश करत तिच्या दिशेने धाव घेतली. मात्र, दोन्ही कानांत इअरबड्स असल्याने अनुष्काला ना मैत्रिणींच्या ओरडण्याचा आवाज आला, ना पाठीमागून येणाऱ्या रेल्वेच्या धडधडीची जाणीव झाली. मैत्रिणी अवघ्या आठ-दहा फुटांच्या अंतरावर पोहोचल्या असतानाच एक्स्प्रेसची भीषण धडक अनुष्काला बसली आणि तिचा मृतदेह हवेत सुमारे ३० फूट उडून दूर फेकला गेला.

हा भीषण आघात इतका भयानक होता की, अनुष्काच्या रक्तामांसाचे शिंतोडे समोर धावणाऱ्या मैत्रिणींच्या अंगावर उडाले, ज्यामुळे प्रचंड मानसिक धक्का बसून त्या जागीच कोसळल्या व बेशुद्ध झाल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच ग्रामीण रुग्णालयातील जीवरक्षक स्वप्निल नरूटे यांनी तातडीने धाव घेत बेशुद्ध मैत्रिणींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्या शुद्धीवर आल्यानंतरच या अपघाताचा थरारक घटनाक्रम उघडकीस आला. दरम्यान, रुग्णालयासमोरील समाजकल्याण वसतिगृह परिसरात सुरक्षेसाठी रेल्वेने दोन्ही बाजूंस अर्धा किलोमीटर जाळी बसवली असली, तरी रुग्णालयाच्या बाजूला रूळ ओलांडण्यासाठी ठेवलेली दोन फुटांची मोकळी जागा अखेर या तरुणीसाठी काळ ठरली. हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह शोकाकुल नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेची नोंद पोलिसांत झाली असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitors :

5428503
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लांजा तालुक्यात २०४३ गणरायांना भक्तिमय वातावरणात निरोप; भाविकांचे पाणावले डोळे, पोलिसांचा चोख बंदोबस्त

Gramin Varta
1 Min Read

Bluetooth Technology Work in Tandem for Indoor Positioning System

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

मिरकरवाडा बंदरातील मोडकळीस आलेल्या विनावापर नौका हटवण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदत

Gramin Varta
1 Min Read

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या संरक्षणासाठी मोलाचा सल्ला

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी महाराष्ट्रासह देश-विदेशात जय्यत तयारी

4 Min Read
महाराष्ट्र

महाराष्ट्रात दुष्काळी संकटावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत; केंद्राची वाट न पाहता राज्य शासन मदत देणार

3 Min Read
महाराष्ट्र

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंचा दुसरा अर्जही फेटाळला

3 Min Read
महाराष्ट्र

डावखरे मानहानी खटल्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची निर्दोष मुक्तता

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?