ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कुडाळ: भंगसाळ नदीच्या डोहात तोल जाऊन दुचाकी कोसळली, मुलासह आईचे ग्रामस्थांनी वाचवले प्राण
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कुडाळ: भंगसाळ नदीच्या डोहात तोल जाऊन दुचाकी कोसळली, मुलासह आईचे ग्रामस्थांनी वाचवले प्राण
कोकण

कुडाळ: भंगसाळ नदीच्या डोहात तोल जाऊन दुचाकी कोसळली, मुलासह आईचे ग्रामस्थांनी वाचवले प्राण

Gramin Varta
Last updated: October 22, 2026 10:30 am
Gramin Varta
123 Views
Share

कुडाळ: सण-उत्सवाच्या मंगल दिनी नियतीने घातलेला घाला आणि डोळ्यांसमोर उभा ठाकलेला साक्षात मृत्यू, अशा थरारक व काळजाचा ठोका चुकवणाऱ्या संकटातून शेलटेवाडीतील ग्रामस्थांनी एका मातेसह तिच्या मुलाला जीवनदान दिले. कुडाळ शहरातील हॉटेल गुलमोहोरनजीक असलेल्या भंगसाळ नदी बंधाऱ्यावरून जात असताना अचानक तोल जाऊन दुचाकी थेट खोल नदीपात्रात कोसळल्याची हृदयद्रावक घटना दसऱ्याच्या दिवशी भरदुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात १९ वर्षीय दुचाकीस्वार निखिल नारायण सावंत आणि त्याच्या मागे बसलेली त्याची आई नेहा नारायण सावंत (वय ४५, रा. आंबडपाल) हे दोघेही गाडीसह थेट पाण्याच्या प्रवाहात फेकले गेले. पाण्याच्या डोहात बुडत असताना त्यांनी जीव वाचवण्यासाठी फोडलेला आक्रोशाचा टाहो ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी क्षणाचाही विलंब न लावता दाखवलेल्या अतुलनीय धाडसामुळे एका निष्पाप कुटुंबाचा संसार उघड्यावर पडता पडता वाचला.

लघु पाटबंधारे विभागामार्फत या बंधाऱ्यावर पाणी साठवणुकीसाठी लोखंडी प्लेट्स बसवण्याचे काम हाती घेण्यात आले असून या जड प्लेट्स बंधाऱ्यावरच ठेवण्यात आल्या होत्या. या अरुंद आणि कामाच्या साहित्याने व्यापलेल्या बंधाऱ्यावरून जात असताना दुचाकीचा ताबा सुटला आणि क्षणार्धात ही दुर्दैवी दुर्घटना घडली. दोघेही नदीच्या प्रवाहात बुडत असल्याचे आणि त्यांचा आर्त टाहो कानावर पडताच शेलटेवाडीतील स्थानिक युवक प्रसाद शेलटे, नारायण शेलटे, अक्षय शेलटे, उमेश शेलटे आणि महेश शेलटे यांनी स्वतःच्या प्राणांची तमा न बाळगता थेट नदीपात्रात उड्या घेतल्या. या देवदूतांनी कमालीचे प्रसंगावधान राखून आई आणि मुलाला पाण्याच्या प्रवाहातून सुखरूप बाहेर काढत मृत्यूच्या दारातून माघारी आणले.

या गंभीर अपघातात दोघेही जखमी झाले असून त्यांना तातडीने कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक वैद्यकीय उपचार केल्यानंतर मातेची प्रकृती चिंताजनक असल्याने नेहा सावंत यांना अधिक उपचारासाठी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. खोल पाण्यात बुडालेली दुचाकीही ग्रामस्थांनी जेटीच्या साहाय्याने अथक परिश्रम करून बाहेर काढली. दरम्यान, या बंधाऱ्यावरून दुचाकींची सातत्याने मोठी वर्दळ सुरू असतानाही सुरक्षिततेच्या बाबतीत दाखवले गेलेले दुर्लक्ष अशा जीवघेण्या अपघातांना निमंत्रण देत असल्याचा संतप्त सूर व्यक्त होत असून, ग्रामस्थांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळेच दसऱ्याच्या सणाला एका आई-मुलाचा जीव वाचल्याने त्यांचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.

Total Visitors :

5469136
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातही चिपळूण पोलिसांची कर्तव्यतत्परता; रिक्षाचालकाचा हरवलेला मोबाईल शोधून केला सुपूर्द

Gramin Varta
2 Min Read

अन्न व औषध प्रशासनाचा दणका; जिल्ह्यातील २३ आस्थापनांचे परवाने निलंबित, त्रुटींची पूर्तता केल्यानंतर १६ दुकानांचे शटर पुन्हा उघडले

Gramin Varta
1 Min Read

गणेशोत्सवापूर्वी चिपळूणच्या रस्त्यांची डागडुजी करा

saurabhsalvi262@gmail.com
2 Min Read

दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

कोकण

‘सुपर एल निनो’चा जगाला धडकी भरवणारा इशारा! २०२७ मध्ये कोकणातील आंबा-काजू व भातशेतीवर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या सविस्तर विशेष रिपोर्ट

7 Min Read
कोकण

मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; महाडजवळ दीड कोटींची गोवा बनावटीची व्हिस्की जप्त, ट्रकसह चालकाला बेड्या

2 Min Read
कोकण

मंगळुरू एक्सप्रेसमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी उघड; ठाणे रेल्वे स्थानकात अटेंडंटकडून ७१ हजारांचा अवैध मद्यसाठा जप्त

2 Min Read
कोकण

रायगड- भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?