ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: जि.प.आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडीत ‘नवदुर्गांना वंदन’ उपक्रम संपन्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » जि.प.आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडीत ‘नवदुर्गांना वंदन’ उपक्रम संपन्न
रत्नागिरी

जि.प.आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडीत ‘नवदुर्गांना वंदन’ उपक्रम संपन्न

Gramin Varta
Last updated: October 22, 2026 7:47 pm
Gramin Varta
271 Views
Share

नऊ दिवस, नऊ महान स्त्रियांच्या भूमिकेतून विद्यार्थिनींनी साकारले कर्तृत्व; एकपात्री अभिनयाने वेधले लक्ष

गणपतीपुळे (वैभव पवार): नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, वाटद कवठेवाडी येथे ‘नवदुर्गांना वंदन’ हा अभिनव व प्रेरणादायी उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. नऊ दिवस नऊ महान स्त्रिया या संकल्पनेतून शाळेतील विद्यार्थिनींनी इतिहास, समाजसुधारणा, शिक्षण, महिला सक्षमीकरण, समाजसेवा, राजकारण आणि विज्ञान अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या विभूतींच्या भूमिका वेशभूषा आणि एकपात्री अभिनयाच्या माध्यमातून साकारल्या. या सादरीकरणातून विद्यार्थिनींनी संबंधित चरित्रांची सविस्तर माहिती देत उपस्थितांची मने जिंकली.

या उपक्रमात भारतीय इतिहासातील आदर्श व्यक्तिमत्त्वांना कृतीयुक्त अभिनयातून अभिवादन करण्यात आले. यामध्ये राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत तन्वी नितीन कुर्टे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या भूमिकेत श्रावणी उदय रहाटे, राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेत आराध्या विकास रहाटे, क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या भूमिकेत रिद्धी अजित कुर्टे, रमाई आंबेडकर यांच्या भूमिकेत परी विश्वनाथ कुर्टे, अनुताई वाघ यांच्या भूमिकेत निधी सागर घवाळी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत समिता सचिन तांबटकर, ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या भूमिकेत सिद्धी अजित कुर्टे तर अंतराळवीर कल्पना चावला यांच्या भूमिकेत त्रिषा हेमंत धनावडे यांनी प्रभावी सादरीकरण केले.

उपक्रमाचे नियोजन गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता रमेश तोटावार आणि वाटद केंद्रप्रमुख मीनाक्षी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक माधव विश्वनाथ अंकलगे व शिक्षिका पुनम चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा विकास समितीचे अध्यक्ष आप्पा धनावडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निकिता नितीन कुर्टे, उपाध्यक्ष सागर घवाळी, सदस्य रमेश तांबटकर, उदय रहाटे, विश्वनाथ शिर्के, अंगणवाडी सेविका सुजाता लोहार, मदतनीस समीक्षा भास्कर घवाळी तसेच पोषण आहार कर्मचारी अक्षरा विश्वनाथ शिर्के यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थिनींच्या वेशभूषा आणि पूर्वतयारीसाठी पालकांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्त्रीशक्तीविषयी आदर, सामाजिक जाणीव आणि थोर व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा वारसा निर्माण व्हावा यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे शाळा विकास समितीचे अध्यक्ष आप्पा धनावडे यांनी नमूद केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षणाची पायाभरणी होत असल्याचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा निकिता कुर्टे यांनी सांगितले, तर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उदय रहाटे यांनी शाळेने विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांना दिलेला वाव अत्यंत स्तुत्य असल्याचे मत व्यक्त केले. नवरात्रोत्सव केवळ पारंपरिक पूजेपुरता मर्यादित न ठेवता समाजासाठी आदर्श कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीत रुजविण्याच्या शाळेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Total Visitors :

5468418
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लाडक्या बहिणींसाठी दिलासा; ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता २४ सप्टेंबरनंतर बँक खात्यात जमा होण्याची शक्यता

Gramin Varta
2 Min Read

नवी मुंबईत फटाके फोडण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंतच मुदत; प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन

Gramin Varta
2 Min Read

मतदार यादीतील घोळाविरोधात आज राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयावर धडकणार

Gramin Varta
2 Min Read

लांजा शहरातील शेट्येवाडी येथे श्री देवी भगवती नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीत ६० हजार रुपयांच्या गांजासह एकजण ताब्यात

1 Min Read
रत्नागिरी

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा; ‘व्होट चोरी’च्या आरोपावरून रणशिंग फुंकले

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : सैतवडे पेठ मोहल्ला येथे आईच्या आजारपणाच्या चिंतेत तरुणाने जीवन संपविले

2 Min Read
रत्नागिरी

तरवळ जाधववाडीत ग्रामस्थांनी उभारला श्रमदानातून वनराई बंधारा; दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी एकजूट

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?