ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: अवघ्या चार दिवसांत तीन तरुणींच्या आत्महत्येने रत्नागिरी जिल्हा सुन्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » अवघ्या चार दिवसांत तीन तरुणींच्या आत्महत्येने रत्नागिरी जिल्हा सुन्न
रत्नागिरी

अवघ्या चार दिवसांत तीन तरुणींच्या आत्महत्येने रत्नागिरी जिल्हा सुन्न

Gramin Varta
Last updated: October 23, 2026 9:43 pm
Gramin Varta
978 Views
Share

खेड, चिपळूण आणि गुहागरमधील घटनांनी खळबळ

रत्नागिरी : जिल्ह्यात अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत ऐन विशीतील तीन तरुणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. खेड, चिपळूण आणि गुहागर या तीन तालुक्यांत १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान घडलेल्या या हृदयद्रावक घटनांमुळे सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त होत असून, या तिन्ही प्रकरणांमध्ये आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

पहिली घटना खेड तालुक्यातील घाणेखुंट येथे १७ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. मूळची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील रहिवासी असलेली दिव्या दत्तात्रय काळे (वय २१) ही तरुणी घाणेखुंट येथे भाड्याच्या खोलीत राहत होती. तिने सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या खोलीतील सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. तिला तात्काळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ही घटना ताजी असतानाच, २० ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास चिपळूण तालुक्यातील रावळगाव सुर्वेवाडी येथे अमिषा अरविंद सुर्वे (वय २३) या तरुणीने राहत्या घराच्या पडवीत अज्ञात कारणावरून गळफास घेतला. कुटुंबीयांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी धाव घेतली, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले असून चिपळूण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

तिसरी घटना त्याच दिवशी म्हणजे २० ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे घडली. मूळची कराड येथील रहिवासी असलेली आणि वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थिनी अंजली अमोल पाटील (वय अंदाजे २०) हिने ओझरवाडी येथील भाड्याच्या खोलीत लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिव्या, अमिषा आणि अंजली या तिन्ही तरुणींनी टोकाचे पाऊल नेमके का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित पोलीस ठाण्यांकडून या प्रकरणांचा सखोल तपास सुरू आहे. शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी झगडणाऱ्या तरुणाईच्या अशा टोकाच्या पावलांमुळे संपूर्ण कोकणात तीव्र चिंता आणि शोक व्यक्त होत आहे.

Total Visitors :

5468408
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरी जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करा; ‘निर्भय बनो’ संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, लांजा तहसीलदारांना निवेदन सादर

Gramin Varta
2 Min Read

मंडणगड येथे ढाब्यावर जिन्यावरून पडून जखमी झालेल्या आचाऱ्याचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

मंडणगड-वेळास एसटी बसला धोकादायक वळणावर अपघात; तीन प्रवासी जखमी, मोठी जीवितहानी टळली

Gramin Varta
2 Min Read

जयगड : दुचाकी कठड्याला धडकून दरीत कोसळली; अपघातात चालकाचा मृत्यू, दोन तरुण जखमी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी रेल्वेस्थानकावर एटीव्हीएम यंत्र दाखल; प्रवाशांची तिकीट खिडकीवरील लांबलचक रांगांमधून कायमची सुटका

2 Min Read
रत्नागिरी

जिल्हा नियोजन बैठकीत आ. भास्कर जाधवांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात; निधी वाटपातील पक्षपातावरून पालकमंत्र्यांना घेरले

3 Min Read
रत्नागिरी

ढगाळ हवामान व अवकाळीमुळे आंबा-काजू बागा संकटात; फळ संशोधन केंद्राकडून २४ ते ३० ऑक्टोबरसाठी तातडीचा कृषी सल्ला जारी

2 Min Read
रत्नागिरी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी प्रसिद्ध; राज्यातील ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?