ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: फायनान्स कंपन्यांच्या मनमानीला पोलिसांचे पाठबळ? चिपळूण पोलीस ठाण्यासमोर २९ ऑक्टोबरला महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे धरणे आंदोलन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » फायनान्स कंपन्यांच्या मनमानीला पोलिसांचे पाठबळ? चिपळूण पोलीस ठाण्यासमोर २९ ऑक्टोबरला महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे धरणे आंदोलन
चिपळूण

फायनान्स कंपन्यांच्या मनमानीला पोलिसांचे पाठबळ? चिपळूण पोलीस ठाण्यासमोर २९ ऑक्टोबरला महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे धरणे आंदोलन

Gramin Varta
Last updated: October 27, 2026 8:20 pm
Gramin Varta
219 Views
Share

चिपळूण: फायनान्स कंपन्यांकडून वाहने बेकायदेशीरपणे ओढून (जप्त करून) री-पझेशन करण्याच्या मनमानी कारभाराला उघडपणे पाठीशी घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात महाराष्ट्र लोकाधिकार समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या बेकायदेशीर कृत्यांचा पर्दाफाश करण्यासाठी आणि संबंधित प्रवृत्तींचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी येत्या २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यासमोर तीव्र धरणे निदर्शने आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा समितीचे रत्नागिरी जिल्हा विभागीय संघटक अनिकेत शेखर साळवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. या आंदोलनाबाबत चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, रत्नागिरी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने रीतसर लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.

या आंदोलनामागील मुख्य प्रकरणाची पार्श्वभूमी मांडताना अनिकेत साळवी यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या ताब्यातील ‘MH09 AG 9997’ या क्रमांकाचा ट्रक चोरीला गेल्याची सविस्तर तक्रार त्यांनी २० जून २०२६ रोजी अर्ज दाखल करून चिपळूण पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, या गंभीर अर्जाच्या चौकशीदरम्यान चिपळूण पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत सकपाळ (ब. क्र. १२२२) हे फायनान्स कंपन्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालत असल्याचे आणि त्यांच्या गैरकृत्यांना सहकार्य करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अशी माहिती अनिकेत साळवी यांनी दिली. नियमांची पायमल्ली करून वाहने ओढणाऱ्या फायनान्स कंपन्या आणि त्यांना अभय देणारे पोलीस कर्मचारी यांचे संगनमत शासन, प्रशासन आणि समाजाच्या पटलावर उघडे पाडण्यासाठी हे धरणे आंदोलन पुकारण्यात आले असून, या आंदोलनात महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे अनिकेत साळवी यांनी जाहीर केले आहे.

Total Visitors :

5469360
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीत नंबर प्लेट नसलेली पल्सर दुचाकी जप्त; फगरवठार परिसरात एका संशयितावर शहर पोलिसांची कारवाई

Gramin Varta
2 Min Read

लांजात जलसंवर्धनासाठी नागरिक सरसावले; स्वामी मठ परिसरात वनराई बंधाऱ्याची उभारणी

Gramin Varta
2 Min Read

शहरातील पुतळ्यांजवळील बंद सीसीटीव्ही सुरू करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी, एसपी बगाटे यांच्याकडून तत्काळ सूचना

Gramin Varta
2 Min Read

देवरुख : पालकर फाऊंडेशनमधील ५० हजार २०० रुपयांची रोकड लंपास

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

चिपळूण

चिपळूण : रावळगाव येथे २३ वर्षीय तरुणीची गळफास लावून आत्महत्या

1 Min Read
चिपळूण

सावर्डेच्या स्वराज जोशीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्णभरारी; मंगळूर येथील १० किमी क्रॉस कंट्री स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

3 Min Read
चिपळूण

कोयनेचे समुद्रात वाहून जाणारे पाणी कोकणासह दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला द्या; माजी खासदार हुसेन दलवाईंची मागणी

1 Min Read
चिपळूण

चिपळूण : कोळकेवाडीत घर फोडून तांब्या पितळेची भांडी चोरीला

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?