ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत नंबर प्लेट नसलेली पल्सर दुचाकी जप्त; फगरवठार परिसरात एका संशयितावर शहर पोलिसांची कारवाई
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत नंबर प्लेट नसलेली पल्सर दुचाकी जप्त; फगरवठार परिसरात एका संशयितावर शहर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी

रत्नागिरीत नंबर प्लेट नसलेली पल्सर दुचाकी जप्त; फगरवठार परिसरात एका संशयितावर शहर पोलिसांची कारवाई

Gramin Varta
Last updated: October 8, 2026 4:03 pm
Gramin Varta
178 Views
Share

रत्नागिरी (प्रतिनिधी): शहरातील फगरवठार पोलीस लाईन परिसरामध्ये नंबर प्लेट नसलेल्या संशयास्पद पल्सर मोटारसायकलवरून फिरणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे २५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची बजाज पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल सुरेश जगताप (वय २४ वर्षे, व्यवसाय-भंगार खरेदी-विक्री/फिरस्ते, रा. स्टेट बँक कॉलनी, साळवी स्टॉप झोपडपट्टी, ता. जि. रत्नागिरी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भालचंद्र दिलीप मयेकर हे फगरवठार परिसरात कर्तव्यावर असताना त्यांना एका काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलला पुढील नंबर प्लेट नसल्याचे निदर्शनास आले. संशय बळावल्याने त्यांनी चालकाला थांबवून चौकशी केली. मात्र, चालकाकडे वाहनाच्या मालकी हक्काबाबत कोणतीही वैध कागदपत्रे आढळली नाहीत, तसेच त्याने दिलेल्या उत्तरांमध्ये मोठी विसंगती दिसून आली.

ताब्यातील दुचाकी ही चोरीची किंवा फसवणूक करून आणलेली असावी असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी सुमारे २५ हजार रुपये किमतीची १५० सीसी क्षमतेची काळ्या रंगाची पल्सर दुचाकी (गाडी क्र. एमएच ०८ यु ९४६३) जप्त केली आहे. पोलीस हवालदार भालचंद्र मयेकर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अमोल जगताप याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १२४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, ही दुचाकी नेमकी कुठून आणली याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5469363
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

‘नमो’चे चार हजार थकवून पाच हजारांच्या मदतीचा दिखावा; राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणावर शेतकरी संघटनांचा घणाघात

Gramin Varta
2 Min Read

उपकेंद्र दाभोळे येथे माझे गाव आरोग्य संपन्न गाव कृती दल समितीची बैठक संपन्न

Gramin Varta
1 Min Read

टीसीएस प्रकरणाची सुनावणी आता नाशिक जिल्हा न्यायालयात

Gramin Varta
2 Min Read

कामगार हक्कांच्या लढ्याला सन्मान; अनिल जाधव यांना ‘सह्याद्री जीवनगौरव पुरस्कार’

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: कोळंबेतील डोहात बुडून कल्याणच्या दोन क्रिकेटपटूंचा मृत्यू; क्रिकेट सामना संपल्यानंतर पोहण्याचा मोह ठरला जीवघेणा

2 Min Read
रत्नागिरी

जाकादेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली नर्सरी व गणपती कारखान्याला क्षेत्रभेट

2 Min Read
रत्नागिरी

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर होमगार्ड्सची कडक नजर; ‘सी-प्रहरी’ सायकल गस्तीमुळे पर्यटकांची सुरक्षा अधिक भक्कम

1 Min Read
रत्नागिरी

आधीच्या कर्जातून मुक्ती; नव्या कर्जासाठी मात्र अडसर

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?