ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: आधीच्या कर्जातून मुक्ती; नव्या कर्जासाठी मात्र अडसर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » आधीच्या कर्जातून मुक्ती; नव्या कर्जासाठी मात्र अडसर
रत्नागिरी

आधीच्या कर्जातून मुक्ती; नव्या कर्जासाठी मात्र अडसर

saurabhsalvi262@gmail.com
Last updated: September 2, 2026 7:12 am
saurabhsalvi262@gmail.com
3 Views
Share

रत्नागिरी : शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळविताना जुन्या कर्जाच्या नोंदी आणि कागदपत्रांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही शेतकरी कर्जमुक्त झाले असले तरी बँकांच्या कर्ज प्रक्रियेमुळे नव्याने पीक कर्ज घेताना त्यांची कोंडी होत असल्याचे चित्र आहे.

नवीन पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यामध्ये फेरफार उतारा जोडणे अनिवार्य आहे. अनेक शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर फेरफार क्रमांक नोंदवलेला असला तरी संबंधित फेरफाराचा दस्तऐवज रेकॉर्ड रूममधून मिळविताना अडचणी येत आहेत. परिणामी कर्जप्रकरणे मंजूर होण्यास विलंब होत आहे.

नवीन कर्जप्रकरण तयार झाल्यानंतरही ते थेट शाखास्तरावर मंजूर होत नाही. बँकेच्या विभागीय कार्यालयाची मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित कर्जप्रकरणाला अंतिम मंजुरी दिली जाते. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करूनही शेतकऱ्यांना मंजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

दरम्यान, कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर जुने कर्ज खाते बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, जुन्या कर्जाचे खाते बंद करण्याचा अधिकार शाखास्तरावर तत्काळ उपलब्ध नसल्याने ही प्रक्रिया विभागीय स्तरावर करावी लागत आहे. परिणामी कर्जमाफीचा लाभ मिळूनही नव्या पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

कर्जप्रकरणाची पडताळणी करताना बँकेच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्याच्या घराचे तसेच शेतीचे जीपीएस मॅपिंग केले जाणार आहे. प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन माहितीची पडताळणी करण्याची ही प्रक्रिया असल्याने प्रत्येक कर्जप्रकरणासाठी अधिक वेळ लागत आहे. त्यामुळे एका दिवसात सरासरी दहा प्रकरणेच निकाली काढली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवीन पीक कर्जासाठी वाढलेल्या कागदपत्रांची प्रक्रिया, फेरफार, जीपीएस मॅपिंग आणि विभागीय कार्यालयाची मंजुरी यामुळे शेतकऱ्यांचा कर्ज मिळण्याचा कालावधी वाढला आहे. परिणामी नवीन पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना किमान सहा महिने प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Total Visitors :

5427562
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

८ चुलते, ७२ माणसे अन् ३५ वर्षांची परंपरा; दोणवली बामणेवाडीतील कदम कुटुंबीयांच्या सामूहिक गणेशोत्सवात तीन पिढ्यांचा संगम

Gramin Varta
2 Min Read

राजापूर: एसटी बसमधून महिलेच्या बॅगेतील अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Gramin Varta
2 Min Read

विद्युत अपघातात जनावरे दगावल्यास आता ५० हजारांची मदत; महावितरणकडून नुकसानभरपाईच्या रक्कमेत घसघशीत वाढ

Gramin Varta
2 Min Read

चिपळूण नगरपरिषदेसमोर वाहतुकीला अडथळा; पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

मोकाट जनावरे, अंधारे रस्ते आणि पुसलेल्या साईड पट्ट्या; शहराच्या सुरक्षिततेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नगर परिषदेला निवेदन

3 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : नाचणे येथे बोटीवर विराजमान गणराया; ‘समुद्र सफर’ देखाव्याने वेधले भक्तांचे लक्ष

1 Min Read
रत्नागिरी

गणपतीपुळे मंदिरातील भाद्रपदी गणेशोत्सवाची महाप्रसादाने सांगता; सुमारे २१०० भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत मध्यरात्री भरधाव मोटारीचा थरार; थिबा पॅलेस मार्गावर वाहनासह बंगल्याच्या कंपाऊंडला जोरदार धडक

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?