ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: वेरळ घाटाचा धोका टळला; आता अंजणारी घाटातील वाढते अपघात चिंतेचा विषय
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » वेरळ घाटाचा धोका टळला; आता अंजणारी घाटातील वाढते अपघात चिंतेचा विषय
लांजा

वेरळ घाटाचा धोका टळला; आता अंजणारी घाटातील वाढते अपघात चिंतेचा विषय

Gramin Varta
Last updated: October 29, 2026 5:24 pm
Gramin Varta
215 Views
Share

चौपदरीकरणानंतरही अवजड वाहनांचे अपघात सुरूच; तीव्र उतार आणि धोकादायक वळणांमुळे वाहनचालकांची कसरत

लांजा/अरबाज नेवरेकर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा तालुक्यातील वेरळ घाट हा एकेकाळी अपघातांसाठी कुप्रसिद्ध होता. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे या घाटातील धोकादायक वळणे कमी झाल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, आता अंजणारी घाटात अवजड वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढू लागल्याने हा घाट नवीन अपघातप्रवण क्षेत्र म्हणून समोर येत आहे. विशेषतः मठ ते अंजणारी काजळी नदी पुलादरम्यान असलेला तीव्र उतार वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्याच्या हद्दीत अंजणारी, वेरळ आणि वाकेड हे तीन घाट आहेत. यापैकी वेरळ घाटातील तीव्र वळणे आणि अरुंद रस्त्यांमुळे यापूर्वी अनेक भीषण अपघात घडले होते. या घाटात दीडशेहून अधिक लहान-मोठ्या अपघातांची नोंद झाल्याचे सांगितले जाते. तसेच, शंभरहून अधिक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते. तब्बल २२ वेळा अवजड कंटेनर अडकण्याच्या घटनाही घडल्या होत्या. परिणामी, वारंवार वाहतूक कोंडी होऊन महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांना मोठी कसरत करावी लागत होती.

महामार्गाच्या चौपदरीकरणात वेरळ घाटातील धोकादायक यू-आकाराचे वळण आणि घाटाचा काही भाग कमी करण्यात आल्याने येथील वाहतूक तुलनेने सुरळीत झाली आहे. मात्र, वेरळ घाटातील समस्या कमी होत असतानाच अंजणारी घाटात अपघातांची मालिका सुरू झाल्याने वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

अंजणारी घाटातील मठ परिसरापासून काजळी नदीवरील पुलापर्यंत रस्त्याला तीव्र उतार आहे. विशेषतः गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर अवजड वाहनांचा वेग नियंत्रित करणे चालकांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. याच परिसरात कंटेनर आणि ट्रकचे वारंवार अपघात घडत आहेत. गेल्या आठवडाभरात चार, तर महिनाभरात सहा अपघात एकाच परिसरात घडल्याचे समोर आले आहे. या घटनांमुळे वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

सततच्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महामार्ग विभागाने अंजणारी घाटातील तीव्र उतारावर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. काही ठिकाणी बॅरिकेड्स आणि गतिरोधकांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या उपाययोजना कितपत प्रभावी ठरतील, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण चौपदरीकरणापूर्वीही या भागात गतिरोधक उभारण्यात आले होते. तरीदेखील अपघात रोखण्यात अपेक्षित यश मिळाले नव्हते.

दरम्यान, अंजणारी घाटातील रस्त्याच्या रचनेबाबतही नागरिक आणि वाहनचालकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. घाटातील तीव्र उतार आणि वळणांची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन झाले असते, तर अपघातांचा धोका कमी करता आला असता, असे मत व्यक्त होत आहे. तसेच काजळी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाशेजारी उभारण्यात आलेल्या नवीन पुलाच्या जागेचे नियोजन वेगळ्या पद्धतीने केले असते, तर धोकादायक वळण टाळता आले असते, अशाही प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होण्याची अपेक्षा असताना अंजणारी घाटातील वाढते अपघात चिंतेचा विषय बनले आहेत. त्यामुळे केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता घाटातील रस्त्याची रचना, उतार, वळणे आणि अवजड वाहनांच्या सुरक्षिततेचा सखोल अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.

Total Visitors :

5469300
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मंडणगड: हातात चाकू घेऊन गावात दहशत निर्माण करणाऱ्यावर गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

भारतीय वंशाच्या नवी पिल्लई यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर

Gramin Varta
2 Min Read

मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या तन्वी मोरेचा डंका; शास्त्रीय गायनात पटकावले रौप्यपदक

Gramin Varta
1 Min Read

‘आयुष्यात कधीच आंदोलनात सहभागी होणार नाही’; भारत छोडो नोटिशीवर अभिनेता इम्रान खानने कोर्टाची मागितली बिनशर्त माफी

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

लांजा

गुन्हे सिद्धीमध्ये लांजा पोलिसांची दमदार कामगिरी; पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

2 Min Read
लांजा

ब्रेकिंग: लांजा परिसरात शिकारीच्या उद्देशाने दबा धरून बसलेले दोघे ताब्यात; १२ बोअरची बंदूक आणि ४ जिवंत काडतुसे जप्त

2 Min Read
लांजा

लांजा येथे झाडी-झुडपांच्या आडोशाला गांजा ओढणाऱ्या एकावर पोलिसांची कारवाई

1 Min Read
लांजा

लांजात साहित्यिक पाककला स्पर्धेत महिलांच्या कलागुणांचे दर्शन;लोकमान्य वाचनालयाच्या उपक्रमाला प्रतिसाद

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?