ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: झी मराठी अवॉर्ड्स २०२६ मध्ये रंगणार खलनायकांचा अनोखा अंदाज
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » झी मराठी अवॉर्ड्स २०२६ मध्ये रंगणार खलनायकांचा अनोखा अंदाज
महाराष्ट्र

झी मराठी अवॉर्ड्स २०२६ मध्ये रंगणार खलनायकांचा अनोखा अंदाज

Gramin Varta
Last updated: October 30, 2026 8:03 am
Gramin Varta
34 Views
Share

मुंबई: मालिकांमध्ये आपल्या खलनायकी भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे कलाकार यावेळी झी मराठी अवॉर्ड्स २०२६ मध्ये एका अनोख्या अंदाजात पाहायला मिळणार आहे.

या परफॉर्मन्समध्ये प्रत्येक पात्राची खासियत आणि ताकद एका वेगळ्या रूपात सादर केली जाणार आहे. प्रत्येक खलनायकाला एका विशिष्ट प्राण्याची शक्ती देण्यात आली आहे. या अनोख्या संकल्पनेतून खलनायकांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू उलगडणार आहेत. या खास परफॉर्मन्समध्ये ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेतील इंदुराणी, ‘दीपज्योती’ मालिकेतील प्रीती, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील जयंत’, ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील भैरवी आणि ‘कमळी’ मालिकेतील अनिका सहभागी होणार आहेत.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंतची भूमिका साकारणारा मेघन जाधव सांगतो, “हा परफॉर्मन्स माझ्यासाठी एकदम वेगळा अनुभव होता! मी याआधी कधीही असं काही केलं नव्हतं. आम्ही सुरुवातीला रिहर्सल केल्या. आमचे कोरिओग्राफर यांनी हा परफॉर्मन्स खूप छान पद्धतीने तयार केला. त्यांनी मला सांगितलं की, मी या परफॉर्मन्समध्ये व्हॅम्पायरची भूमिका साकारणार आहे. एक मजेशीर गोष्ट म्हणजे अनुष्काला ‘व्हॅम्पायर डायरीज’ ही मालिका खूप आवडते. जेव्हा मी तिला सांगितलं की, मी या परफॉर्मन्समध्ये व्हॅम्पायर बनणार आहे, तेव्हा ती माझ्यापेक्षाही जास्त उत्सुक झाली होती. आम्ही या परफॉर्मन्ससाठी थोडा सराव केला होता. पण प्रत्यक्ष परफॉर्मन्सच्या दिवशी मी थोडा घाबरलो होतो, कारण मी काही नैसर्गिकरीत्या उत्तम डान्स करणारा कलाकार नाही. जेव्हा मला सांगितलं की, हा परफॉर्मन्स थेट प्रेक्षकांसमोर होणार आहे, तेव्हापासून माझ्या काही रात्री झोपेशिवाय गेल्या. कारण प्रेक्षकांसमोर डान्स करणं हा माझ्यासाठी अगदी नवीन अनुभव होता आणि त्यामुळे जबाबदारीही मोठी होती. काही तांत्रिक आणि वेळापत्रकाच्या अडचणींमुळे आम्हाला हा परफॉर्मन्स आधीच शूट करावा लागला. पण रात्रभर शूटिंग करूनही, फक्त तीन तासांची झोप घेऊन मी परफॉर्मन्ससाठी आलो. माझं संपूर्ण लक्ष परफॉर्मन्सवर होतं. शूटिंग सुरू झाल्यानंतर पहिल्याच टेकमध्ये परफॉर्मन्स पूर्ण झाला. सगळ्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन केलं होतं आणि देवाच्या कृपेने ते छान जमलं. आता हा परफॉर्मन्स टीव्हीवर कधी पाहायला मिळतो, याची मला उत्सुकता आहे.”

‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत इंदुराणीची भूमिका साकारणारी साक्षी गांधी सांगते, “मी लहानपणापासून झी मराठी बघत आले आहे. कधी वाटलंही नव्हतं की, आपण एखादी मालिका करू. याआधी मी झी मराठीवर कॅमिओ केला आहे. पण यावर्षी मी झी मराठीवर मुख्य खलनायिकेची भूमिका साकारतेय. बऱ्याचदा हे सगळं स्वप्नवत वाटतं. पण हे सगळं मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे शक्य झालं आहे. त्यांचे आशीर्वाद आणि प्रेम कायम माझ्यासोबत असतं. हे माझं झी मराठी अवॉर्ड्सचं पहिलं वर्ष आहे. आम्ही खूप मज्जा केली. माझा डान्ससुद्धा होता. अशा कार्यक्रमांमध्ये सगळे कलाकार एकत्र येतात, भेटीगाठी होतात. त्यामुळे हा आपल्या घरातल्याच सोहळ्यासारखा वाटतो. संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. धमाल, मज्जा आणि मस्ती असते. कोणाला पुरस्कार मिळेल, याची उत्सुकता असते. अशा अनेक गोष्टींमुळे हा सोहळा परिपूर्ण होतो. तुम्हालाही हा कार्यक्रम बघायला मज्जा येणार आहे.”

Total Visitors :

5468707
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील संरक्षण भिंतीचा तुटलेला भाग पर्यटकांसाठी ठरतोय अडथळा; मेरीटाईम बोर्डाने तातडीने दुरुस्ती करावी!

Gramin Varta
2 Min Read

कोंडगाव ग्रामपंचायतीच्या ‘हर घर जल’ ठरावाला अद्याप सूचक-अनुमोदक मिळेनात; भ्रष्टाचाराच्या संशयावरून माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश सावंत एसीबीकडे जाणार

Gramin Varta
2 Min Read

नायरीतील दिपाली बावदानेची क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी; तालुका क्रीडा स्पर्धेत उंच उडीत सलग तिसऱ्या वर्षी ‘हॅट्रिक’ साधत पटकावला प्रथम क्रमांक

Gramin Varta
1 Min Read

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे कर्करोगाने निधन; तीन दशकांची गाजलेली अभिनय कारकीर्द संपुष्टात

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

पोलीस कोठडीतील छळ आणि मारहाणीमुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकांना ५ लाखांची भरपाई

1 Min Read
महाराष्ट्र

फटाक्यांच्या धुरामुळे आणि ठिणग्यांमुळे डोळ्यांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष पडेल महागात; निष्काळजीपणामुळे अंधत्व येण्याची तज्ज्ञांकडून भीती व्यक्त

2 Min Read
महाराष्ट्र

केंद्रीय पथकाकडून महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी दौरा सुरू

4 Min Read
महाराष्ट्र

सीजेपी आणि एआयएसए १० ऑक्टोबरला जंतर-मंतरवर करणार आंदोलन

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?