ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कळझोंडीत ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा; महामानवांच्या जयघोषात भव्य धम्म रॅली संपन्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कळझोंडीत ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा; महामानवांच्या जयघोषात भव्य धम्म रॅली संपन्न
रत्नागिरी

कळझोंडीत ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा; महामानवांच्या जयघोषात भव्य धम्म रॅली संपन्न

Gramin Varta
Last updated: October 30, 2026 10:03 am
Gramin Varta
30 Views
Share

रत्नागिरी/ अमित कांबळे: रत्नागिरी तालुक्यातील बौद्धजन पंचायत समिती कळझोंडी पंचशील नगर शाखा क्रमांक ११ च्या वतीने अशोका विजयादशमीनिमित्त ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी अत्यंत मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. शाखेचे अध्यक्ष अनिल पवार गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, प्रमुख वक्त्या तथा बौद्धाचार्या करुणा पवार, उपाध्यक्ष संदीप पवार, सभापती प्रकाश पवार, सल्लागार किशोर पवार, सेक्रेटरी सुभाष पवार, ज्येष्ठ कला शिक्षक उत्तम पवार, महिला मंडळ सभापती नम्रता पवार, उपाध्यक्षा संपदा पवार, सेक्रेटरी रीना पवार, सहसचिव करुणा पवार, सल्लागार मयुरी पवार तसेच ज्येष्ठ शिक्षिका अश्विनी अनिल पवार यांच्यासह परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पंचशील धम्म ध्वज आणि निळ्या ध्वजाचे विधिवत ध्वजारोहण करून महापुरुषांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर महामानव भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले, तसेच बौद्धाचार्या करुणा पवार व दीक्षा पवार यांच्या पौरोहित्याखाली धार्मिक पूजापाठ संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात आयोजित अभिवादन सभेत राजरत्न पवार, अनुप पवार, श्रावस्ती पवार, सोनाली पवार, रीना पवार, किशोर पवार, सुभाष पवार, प्रकाश पवार आणि अध्यक्ष अनिल पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीवर सविस्तर प्रकाश टाकून उपस्थितांना मार्गदर्शन केले. सभेच्या समाप्तीनंतर शाखाध्यक्ष अनिल पवार गुरुजी व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने उपस्थित सर्व धम्मबांधवांसाठी सामुदायिक भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या सत्रात सायंकाळी ४ वाजता कळझोंडी पंचशील बुद्ध विहारापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, सिद्धार्थनगर, सुंदरवाडी मार्गे पुन्हा पंचशील बुद्ध विहारापर्यंत महामानवांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. बॅन्जोवरील धम्म क्रांतीगीतांच्या सुरावटी, ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक लेझीम पथकाच्या तालावर निघालेल्या या रॅलीचे नेतृत्व अध्यक्ष अनिल पवार यांच्यासह प्रकाश पवार, सुभाष पवार, संदीप पवार, किशोर पवार, नम्रता पवार, मयुरी पवार आणि शितल पवार यांनी केले. विशाल पवार आणि युवक मंडळाच्या सहकार्याने यशस्वी झालेल्या या धम्म रॅलीनंतर सायंकाळी ७ वाजता बुद्ध विहारात सामुदायिक त्रिशरण, पंचशील ग्रहण आणि शरणत्तय गाथेच्या पठणाने संपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली.

Total Visitors :

5469367
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

सलमान खानचा सैनिकाच्या वेशातील दमदार अवतार; ‘मातृभूमी’च्या ट्रेलरच्या झलकने चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

Gramin Varta
3 Min Read

पाचल येथील कै. ज्ञा. म. नारकर वाचनालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात; पाच दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

Gramin Varta
1 Min Read

चिपळूण : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला इंडिया आघाडीचा मोर्चा

Gramin Varta
2 Min Read

गाणे-खडपोली येथील साफयीस्ट कंपनीच्या निवृत्त कामगारांच्या ग्रॅच्युइटीचा तिढा; मा. खासदार विनायक राऊत यांच्याकडे न्यायासाठी साकडे

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीच्या रुद्र महालेचा जागतिक स्तरावर ऐतिहासिक पराक्रम; १०० मीटर बॅकवर्ड स्केटिंगमध्ये नोंदवले ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

2 Min Read
रत्नागिरी

२ महाराष्ट्र नवल युनिट एनसीसीतर्फे रत्नागिरीत ऐतिहासिक ‘मेन्यू २७’ ओपन सी सेलिंग मोहीम यशस्वी; ६० कॅडेट्सचा २५० किमी सागरी प्रवास संपन्न

2 Min Read
रत्नागिरी

अवघ्या चार दिवसांत तीन तरुणींच्या आत्महत्येने रत्नागिरी जिल्हा सुन्न

2 Min Read
रत्नागिरी

एक कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक; रत्नागिरीत ४० ते ४५ नागरिक जाळ्यात

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?