ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: एक कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक; रत्नागिरीत ४० ते ४५ नागरिक जाळ्यात
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » एक कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक; रत्नागिरीत ४० ते ४५ नागरिक जाळ्यात
रत्नागिरी

एक कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक; रत्नागिरीत ४० ते ४५ नागरिक जाळ्यात

Gramin Varta
Last updated: September 30, 2026 9:54 am
Gramin Varta
240 Views
Share

रत्नागिरी: फक्त एक लाख रुपये भरा आणि अवघ्या एक टक्का व्याजदराने तब्बल एक कोटी रुपयांचे कर्ज मिळवा, असे मोठे आमिष दाखवून अनेक नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत उघडकीस आला आहे. या आर्थिक जाळ्यात सुमारे ४० ते ४५ नागरिक अडकले असून, काही नागरिकांना तर तब्बल चार कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे समोर आले आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांनी या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून, या संपूर्ण प्रकरणामागे मोठे आर्थिक रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने कर्ज प्रकरण मंजूर करून देण्याचा बहाणा करत नागरिकांकडून ऑनलाइन पद्धतीने प्रत्येकी एक लाख रुपये उकळले. पैसे भरल्यानंतर महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरी कोणाचेही कर्ज मंजूर झाले नाही. याबाबत विचारणा केली असता संबंधितांकडून वेगवेगळ्या तारखा देऊन केवळ वेळकाढूपणा करण्यात आला. या व्यवहारावर नागरिकांचा पूर्ण विश्वास बसावा यासाठी तब्बल १५ कोटी रुपयांची मोठी रक्कम दाखवण्यात आली होती. ही रक्कम ‘बँक मनी’ असल्याचे भासवून ती गुहागर येथून आणल्याचा दावाही संशयितांकडून करण्यात आला होता, असे तक्रारीत नमूद आहे. विविध व्यक्तींमध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या ऑनलाइन आर्थिक देवाणघेवाणीचे पुरावेही तक्रारदारांनी पोलिसांसमोर सादर केले आहेत. याशिवाय चार दिवसांपूर्वी गणेशगुळे फाट्यावर मध्यरात्री संशयास्पदरीत्या पैशांचे वाटप झाल्याचा दावा करत या संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांनी लावून धरली आहे.

कर्ज मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी दिलेले पैसे परत मागण्यास सुरुवात केली असता, संबंधित महिलेने त्यांना चक्क जीवे मारण्याची गंभीर धमकी दिली. पोलिसांत तक्रार केल्यास किंवा १५ कोटी रुपयांच्या व्यवहाराची माहिती बाहेर सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा धाक दाखवण्यासह खोटी कागदपत्रे व धनादेश तयार करून गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या कथित आर्थिक गैरव्यवहारात रोख रक्कम वाहून नेण्यासाठी एका रिक्षाचा वापर झाल्याचा दावा करण्यात आला असून, लाखो आणि कोट्यवधी रुपयांची रोकड या रिक्षातून नेल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित रिक्षाचालक व मालकाचा शोध घेऊन त्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केल्यानंतरच या आर्थिक फसवणुकीची खरी व्याप्ती आणि सहभागी चेहरे स्पष्ट होणार असून, पोलीस आता यावर काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी मोठा निर्णय; निकृष्ट ‘टेंपर्ड ग्लास’च्या विक्रीला चाप

Gramin Varta
2 Min Read

पडिक पाण्याच्या टाकीत अडकलेल्या मगरीच्या पिल्लाची सुटका

Gramin Varta
1 Min Read

खापणे महाविद्यालयाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाने वेधले ग्रामस्थांचे लक्ष

Gramin Varta
2 Min Read

Revolutionizing Entertainment Key Insights into the Digital Transformation Shift

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी विमानतळ आयएलएससाठी घरे व मंदिरे पाडणार नाही; बाधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत दमण मॉडेलचा पर्याय तपासण्याचे आदेश

2 Min Read
रत्नागिरी

घनकचरा व्यवस्थापनात हलगर्जी खपवून घेणार नाही; तारीखनिहाय अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

2 Min Read
रत्नागिरी

महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर कर; गणपतीपुळेच्या श्रींच्या चरणी भाविकांचे अंगारकीला साकडे

2 Min Read
रत्नागिरी

आरोग्य शिबिरांसह वृक्षारोपणाने उद्यापासून रत्नागिरीत ‘सेवा संकल्प अभियाना’ला सुरुवात

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?