ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा : इंदवटी जाधववाडी येथून २३ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा : इंदवटी जाधववाडी येथून २३ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा
लांजा

लांजा : इंदवटी जाधववाडी येथून २३ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा

Gramin Varta
Last updated: November 2, 2026 11:44 am
Gramin Varta
309 Views
Share

लांजा : तालुक्यातील इंदवटी जाधववाडी येथून पुण्याला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडलेला २३ वर्षीय तरुण अद्याप घरी परतला नसल्याने खळबळ उडाली आहे. स्वप्निल धनंजय जाधव असे बेपत्ता तरुणाचे नाव असून, त्याला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार त्याच्या काकू सुवर्णा जाधव यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल जाधव हा ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास इंदवटी जाधववाडी येथून पुण्याला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता. मात्र, तो अद्याप घरी परतला नसल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी शोधाशोध केली. स्वप्निल याला फिर्यादीच्या संमतीशिवाय अज्ञात व्यक्तीने फूस लावून अज्ञात कारणास्तव पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

स्वप्निल धनंजय जाधव (वय २३) हा व्यवसायाने चालक असून, सध्या तो गोटवडे फाटा, मावली निगते वस्ती, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथे राहत होता. त्याचे मूळ गाव इंदवटी जाधववाडी, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी आहे.

या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याच्या दृष्टीने पोलीस पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5468418
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण तालुक्यात इतिहासात पहिल्यांदाच ऑक्टोबरमध्ये टँकरची मागणी; पावसाच्या तुटवड्यामुळे तीव्र पाणीटंचाईची चाहूल

Gramin Varta
2 Min Read

सुप्रीम कोर्टाने फेटाळली शाळांमध्ये दररोज संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्याची मागणी करणारी याचिका

Gramin Varta
2 Min Read

गणेश चतुर्थीपूर्वी चिपळूणचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार

Gramin Varta
2 Min Read

गुहागर तालुक्यातील तळवली परिसरात बिबट्याची दहशत; वनविभागाकडून पाहणी करत ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

लांजा

किरणोदय फाउंडेशनतर्फे लांजात १७ ऑक्टोबरला महिलांसाठी भव्य दांडिया गरबा रास सोहळा!

3 Min Read
लांजा

लांजा : नौशाद नेवरेकर यांची मस्जिद ए अब्बास ट्रस्टच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

1 Min Read
लांजा

लांजा येथील ७८ वर्षीय महिलेची ६० लाखांची सायबर फसवणूक; पोलीस अधिकारी असल्याचे भासवून अटकेची धमकी

2 Min Read
लांजा

अंजणारी घाट बनतोय मृत्यूचा सापळा; १३ ऑगस्टच्या निवेदनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, अपघातांची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची दत्ताजी कदम यांची मागणी

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?