ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी जिल्हा न्यायालयात काहीही संशयास्पद आढळले नाही; चार तासांचे सर्च ऑपरेशन अखेर थांबले
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी जिल्हा न्यायालयात काहीही संशयास्पद आढळले नाही; चार तासांचे सर्च ऑपरेशन अखेर थांबले
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा न्यायालयात काहीही संशयास्पद आढळले नाही; चार तासांचे सर्च ऑपरेशन अखेर थांबले

Gramin Varta
Last updated: November 2, 2026 7:29 pm
Gramin Varta
216 Views
Share

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा ईमेल प्राप्त झाल्यानंतर सुरू करण्यात आलेले व्यापक सर्च ऑपरेशन अखेर थांबवण्यात आले असून न्यायालयात कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटके आढळून आलेली नाहीत, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिली. संपूर्ण परिसराची कसून तपासणी पूर्ण झाल्याने आता न्यायालयाचे दैनंदिन कामकाज पूर्ववत सुरू करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सोमवारी न्यायालयाच्या अधिकृत मेलवर बॉम्ब ठेवल्याचा संदेश आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दुपारी दोन वाजल्यापासून पोलीस दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) तसेच श्वान पथकाच्या (डॉग स्क्वॉड) माध्यमातून न्यायालयाची मुख्य इमारत, आवारातील प्रत्येक कक्ष आणि संपूर्ण परिसराची काटेकोरपणे तपासणी हाती घेण्यात आली. सलग तीन ते चार तास युद्धपातळीवर हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. इमारतीचा कानाकोपरा पिंजून काढल्यानंतर कोणतीही आक्षेपार्ह बाब समोर न आल्याने अखेर सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले.

दरम्यान, रत्नागिरीपाठोपाठ राजापूर न्यायालयातही अशाच प्रकारचा ईमेल आला असून तेथेही पोलिसांचे पथक कसून तपासणी करत आहे, अशी माहिती महामुनी यांनी दिली. नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेण्यात आल्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Total Visitors :

5469367
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

तिवरे येथे जलयुक्त शिवार योजनेतून तीन बंधाऱ्यांचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते भूमिपूजन

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर ठाकरे शिवसेना आक्रमक; प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा सिव्हिल प्रशासनाला थेट इशारा

Gramin Varta
2 Min Read

मुर्डी येथे ‘सेवा माझे योगदान’ उपक्रमांतर्गत अंगणवाडी परिसर स्वच्छता; शासकीय योजनांचे प्रबोधन

Gramin Varta
1 Min Read

लेखिका सविता कोकजे यांच्या ‘गुलदस्ता’ पुस्तकाचे प्रकाशन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

प्रशासनाचा ‘क्रीज’ सोडून जिल्हाधिकारी मनुज जिंदल ‘पीच’ वर; जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या बाॕलवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘चौकार

2 Min Read
रत्नागिरी

२ महाराष्ट्र नवल युनिट एनसीसीतर्फे रत्नागिरीत ऐतिहासिक ‘मेन्यू २७’ ओपन सी सेलिंग मोहीम यशस्वी; ६० कॅडेट्सचा २५० किमी सागरी प्रवास संपन्न

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील ४०० जिल्हा परिषद शाळांवर बंद होण्याचे संकट; अत्यल्प पटसंख्येमुळे समायोजनाची तयारी

3 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : ८,८९० विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क शिक्षण विभाग भरणार, पालकांना २१ लाखांचा आर्थिक दिलासा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?