ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी जिल्ह्यातील ४०० जिल्हा परिषद शाळांवर बंद होण्याचे संकट; अत्यल्प पटसंख्येमुळे समायोजनाची तयारी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी जिल्ह्यातील ४०० जिल्हा परिषद शाळांवर बंद होण्याचे संकट; अत्यल्प पटसंख्येमुळे समायोजनाची तयारी
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील ४०० जिल्हा परिषद शाळांवर बंद होण्याचे संकट; अत्यल्प पटसंख्येमुळे समायोजनाची तयारी

Gramin Varta
Last updated: November 9, 2026 9:10 am
Gramin Varta
Share

रत्नागिरी : ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेसमोर पुन्हा एकदा मोठे आव्हान उभे राहिले असून, रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ४०० जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत अत्यंत कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांचे जवळच्या शाळांमध्ये विलीनीकरण करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो शाळांवर बंद होण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने कमी होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सन २०२१-२२ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २ हजार ४९४ शाळा कार्यरत होत्या. या शाळांमध्ये ७३ हजार २३९ विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शाळांची संख्या घटून २ हजार ३६३ इतकी झाली असून, विद्यार्थ्यांची संख्या ५५ हजार ५९७ वर आली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या कालावधीत १३१ शाळा कायमस्वरूपी बंद झाल्या, तर तब्बल १७ हजार ६३४ विद्यार्थ्यांची घट नोंदवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येत झालेली ही घट सुमारे २४ टक्के आहे.

या पार्श्वभूमीवर आता एक ते पाच विद्यार्थी असलेल्या शाळांच्या समायोजनाचा मुद्दा पुढे आला आहे. एका शिक्षकाकडे पाचपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा स्वतंत्रपणे चालवणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना जवळच्या अन्य शाळांमध्ये प्रवेश देऊन संबंधित शाळांचे विलीनीकरण करण्याचे धोरण राबविण्यात येत आहे. यासाठी साधारणतः एक ते दोन किलोमीटर परिसरातील शाळांचा विचार केला जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातही या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या असून, अत्यल्प पटसंख्या असलेल्या सुमारे ४०० शाळांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या शाळांची अंतिम यादी निश्चित झाल्यानंतर समायोजनाबाबत पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे या शाळांचे भवितव्य आता शासनाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

मात्र, या निर्णयामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. डोंगराळ भाग, वाड्या-वस्त्या आणि मुख्य गावापासून दूर असलेल्या वस्त्यांमध्ये जिल्हा परिषद शाळा हीच लहान मुलांच्या शिक्षणाची सर्वात जवळची सुविधा आहे. अशा शाळा बंद झाल्यास विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावातील शाळेत जाण्यासाठी अधिक अंतर पार करावे लागू शकते. विशेषतः लहान वयोगटातील विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सुरक्षितता आणि पालकांवरील वाढणारी जबाबदारी हे प्रश्नही महत्त्वाचे ठरणार आहेत.

शाळांचे समायोजन करण्यामागे प्रशासकीय आणि आर्थिक कारणे असली, तरी ग्रामीण भागातील शैक्षणिक उपलब्धता लक्षात घेऊन निर्णय घेण्याची मागणी पालक आणि शिक्षक संघटनांकडून होत आहे. कमी पटसंख्या हेच शाळा बंद करण्याचे एकमेव निकष ठरू नये, तर विद्यार्थ्यांचे अंतर, भौगोलिक परिस्थिती आणि स्थानिक गरजा यांचाही विचार व्हावा, अशी भूमिका विरोधकांकडून मांडली जात आहे.

आधीच पाच वर्षांत १३१ शाळा बंद झालेल्या असताना आता आणखी ४०० शाळांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण शिक्षण व्यवस्थेच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे आता पालकांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5468400
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूणचे प्रा. चेतन खांडेकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्रदान; गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रातून यश संपादन

Gramin Varta
2 Min Read

राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान मराठी साहित्य संमेलन- मराठी भाषा मंत्री उदय सामंत

Gramin Varta
3 Min Read

भावे आडोम येथे विहिरीत बुडून प्रौढाचा मृत्यू; मजगावच्या धाडसी तरुणांनी विहिरीत उतरून बाहेर काढला मृतदेह

Gramin Varta
3 Min Read

संगमेश्वर: सोनवडे येथे घरात तोल जाऊन पडल्याने वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज; विविध उपक्रमांसह ‘१४५६७’ हेल्पलाईनचा लाभ घेण्याचे आवाहन

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: शिरगावात अज्ञात चारचाकीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी; धडक देऊन चालक पसार

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी तालुक्यात वाढत्या डेंग्यू प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज; व्यापक सर्वेक्षणाचे नियोजन

1 Min Read
रत्नागिरी

अवघ्या चार दिवसांत तीन तरुणींच्या आत्महत्येने रत्नागिरी जिल्हा सुन्न

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?