ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा : जीवघेण्या अंजणारी घाटात उभारणार १०० मीटरचा उड्डाणपूल; २१ कोटींचा सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी मुंबईला रवाना
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा : जीवघेण्या अंजणारी घाटात उभारणार १०० मीटरचा उड्डाणपूल; २१ कोटींचा सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी मुंबईला रवाना
लांजा

लांजा : जीवघेण्या अंजणारी घाटात उभारणार १०० मीटरचा उड्डाणपूल; २१ कोटींचा सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी मुंबईला रवाना

Gramin Varta
Last updated: November 3, 2026 8:35 am
Gramin Varta
184 Views
Share

लांजा: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी घाटाचे चौपदरीकरण करताना तीव्र उतारावर योग्य मार्ग न निघाल्याने हा परिसर अत्यंत धोकादायक बनला असून वाहनचालकांसाठी थेट ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. गेल्या दोन महिन्यांत या तीव्र वळणावर एकामागोमाग एक तब्बल १२ गंभीर अपघात घडूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नव्हत्या. मात्र, परवा रात्री थेट पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातानंतर संपूर्ण शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या धोकादायक वळणाला कायमस्वरूपी छेद देण्यासाठी ठोस पावले उचलली असून, जीवघेणे वळण आणि तीव्र उतार कमी करण्यासाठी नवीन पुलाच्या वरच्या बाजूने १०० मीटर लांबीचा स्वतंत्र उड्डाणपूल बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या कामासाठी सुमारे २१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा सुधारित प्रस्ताव तातडीने मंजुरी मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात पाठवण्यात आला आहे.

सुमारे दोन किलोमीटर अंतराच्या या अंजणारी घाटातील अपघातांची मालिका रोखण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत सात गतिरोधक उभारले आणि १०० रंबलर स्ट्रिपही बसवले; मात्र तरीदेखील भरधाव वाहनांच्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यात यंत्रणेला यश आले नाही. हा भाग सातत्याने ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत असल्याने तीव्र उतार आणि वळण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी सुमारे १७ कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केला होता. परंतु, पोलिसांच्या वाहनाला झालेल्या ताज्या अपघातामुळे परिस्थितीचे गांभीर्य वाढल्याने जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने सुचवलेल्या तांत्रिक पर्यायानुसार वरच्या बाजूला १०० मीटर लांबीचा पूल उभारण्याचा २१ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला. या कामाला शासनाकडून तात्काळ प्रशासकीय व आर्थिक मंजुरी मिळावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता स्वतः प्रस्तावासह मुंबईला रवाना झाले असून, यंत्रणेकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची अधिकृत माहिती बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Total Visitors :

5468675
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

शिपाई पदाची भरती प्रक्रिया रखडली; अंतिम मुदतीनंतर ६८ दिवस उलटूनही नियुक्ती नाही

Gramin Varta
2 Min Read

रत्‍नागिरीतील तरुणाचा ओमानमध्ये विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

चाफेरी सहानवाडीत १५ वर्षांपासून कोजागिरी पौर्णिमा व दीपोत्सवाची परंपरा कायम

Gramin Varta
2 Min Read

वेरळ घाटाचा धोका टळला; आता अंजणारी घाटातील वाढते अपघात चिंतेचा विषय

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

लांजा

वयोमानामुळे जमीन खोदणे झाले कठीण; पाईपलाईन दुरुस्तीसाठी ज्येष्ठ नागरिकाच्या मदतीला पोलीस अंमलदार

2 Min Read
लांजा

लांज्यात वृद्धेच्या मृत्यूचे गूढ; हातातील सोन्याच्या बांगड्या चोरीला, संशयित पोलिसांच्या ताब्यात

2 Min Read
लांजा

अंजनारी घाटातील अपघात रोखण्यासाठी अखेर गतिरोधक उभारणीचे काम सुरू; ग्रामस्थांच्या अखंड पाठपुराव्याला यश

2 Min Read
लांजा

लांजा:धुंदरे मावळतवाडीत ‘मिशन बंधारे’ उपक्रमांतर्गत बंधाऱ्याची उभारणी

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?