ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: आयफोनच्या नादात सुनेने सासूचे मंगळसूत्रच चोरले! ५३ ग्रॅम सोन्याचा ऐवज लंपास करून महागडा शौक पूर्ण
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » आयफोनच्या नादात सुनेने सासूचे मंगळसूत्रच चोरले! ५३ ग्रॅम सोन्याचा ऐवज लंपास करून महागडा शौक पूर्ण
महाराष्ट्र

आयफोनच्या नादात सुनेने सासूचे मंगळसूत्रच चोरले! ५३ ग्रॅम सोन्याचा ऐवज लंपास करून महागडा शौक पूर्ण

Gramin Varta
Last updated: November 11, 2026 8:43 am
Gramin Varta
23 Views
Share

नागपूर : महागड्या वस्तूंची हौस पूर्ण करण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाईल, याचा प्रत्यय नागपुरातील एका धक्कादायक घटनेतून आला आहे. हातात महागडा आयफोन हवा म्हणून एका सुनेने चक्क आपल्या सासूच्याच सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सासूच्या कपाटातील मंगळसूत्र, नेकलेससह तब्बल ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून त्यांची विक्री केल्याचा आरोप सुनेवर आहे. विशेष म्हणजे, या दागिन्यांच्या पैशातून तिने आयफोन खरेदी केल्याचे समोर आले आहे.

नागपुरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. ग्रंथाली आकाश वर्मा असे गुन्हा दाखल झालेल्या सुनेचे नाव असून, तिच्या सासू राधा वर्मा यांनी याप्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली आहे. राधा वर्मा यांचा शिर्डी येथे दर्शनासाठी जाण्याचा बेत होता. त्यासाठी प्रवासाची तयारी करताना त्यांनी कपाटातील दागिने काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेहमीच्या ठिकाणी ठेवलेले सोन्याचे दागिनेच गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात शोधाशोध करूनही दागिने मिळून न आल्याने त्यांनी याबाबत चौकशी सुरू केली.

गायब झालेल्या ऐवजात ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १३ ग्रॅमचा नेकलेस आणि अन्य १० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. या सर्व दागिन्यांची अंदाजे किंमत अडीच लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. घरातील दागिने अशा प्रकारे गायब झाल्याने राधा वर्मा यांना मोठा धक्का बसला.

चौकशीदरम्यान सुनेनेच दागिने घेतल्याचे उघड झाले. तिने दागिने चोरून त्यांची विक्री केल्याची कबुली दिल्याचे समजते. मात्र, चोरी केलेले दागिने अथवा त्यातून मिळालेली रक्कम परत मिळाली नसल्याने सासूने पोलिसांत तक्रार दाखल केली. महागड्या आयफोनची हौस भागवण्यासाठी घरातीलच सोन्याचा ऐवज विकल्याचा हा प्रकार नागपुरात चर्चेचा विषय ठरला आहे.

Total Visitors :

5470138
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापूर: महायुती सरकार शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी; गावागावांत वनराई बंधारे बांधून दुष्काळावर मात करूया : आमदार निलेश राणे

Gramin Varta
2 Min Read

पत्रकार तथा बौद्धाचार्य वैभव पवार यांचे १८ ऑक्टोबर रोजी करबुडे येथे धम्मप्रवचन; वर्षावास प्रवचन मालिकेचा होणार समारोप

Gramin Varta
2 Min Read

गुहागर: नवानगर जेटीवर गांजा सेवन करणाऱ्यावर तरुणावर गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

२०३७ पर्यंत एसटीचा ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट; २०२७ पासून जुन्या बसेसचे होणार ई-बसमध्ये रूपांतर : मंत्री प्रताप सरनाईक

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्यासह पशुधनाच्या चाऱ्याच्या सूक्ष्म नियोजनावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 Min Read
महाराष्ट्र

राज्यात काही भागांतून मान्सूनची माघार; २० जिल्ह्यांत पावसाची तूट

2 Min Read
महाराष्ट्र

‘गोकुळ’च्या सत्तेचा आज फैसला; अध्यक्ष निवडीसाठी बैठक, चार शासननियुक्त संचालकांच्या मतदानावर न्यायालयाच्या अटी

2 Min Read
महाराष्ट्र

दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?