ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: देवदर्शनानंतर मुंबईला परतणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात;चौघांचा जागीच मृत्यू, सात जखमी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » देवदर्शनानंतर मुंबईला परतणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात;चौघांचा जागीच मृत्यू, सात जखमी
महाराष्ट्र

देवदर्शनानंतर मुंबईला परतणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात;चौघांचा जागीच मृत्यू, सात जखमी

Gramin Varta
Last updated: September 17, 2026 9:08 am
Gramin Varta
44 Views
Share

कसारा: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे मनोभावे देवदर्शन आटोपून घराकडे परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला असून, मुंबई-नाशिक महामार्गावरील आटगाव येथे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन निष्पाप बालकांसह चार जणांचा जागीच करुण अंत झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. मुंबईतील जोगेश्वरी येथे वास्तव्यास असलेले आणि मूळ उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रहिवासी असलेले जैस्वाल कुटुंबातील भाविक देवदर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात असताना आटगाव परिसरात त्यांच्या कारचे अचानक ब्रेक फेल झाले आणि त्याच वेळी स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. नियंत्रण गमावलेली ही वेगवान कार महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या एका जुन्या जळालेल्या ट्रकच्या सांगाड्यावर प्रचंड वेगाने जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर होऊन आतील भाविकांना ओळखणेही कठीण झाले होते.

या काळीज पिळवटून टाकणाऱ्या दुर्घटनेत श्रीराम जैस्वाल (३४), आयुष जैस्वाल (८), अवंतिका जैस्वाल (११ महिने) आणि सुरज जैस्वाल (२८) या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या राधिका जैस्वाल (३०), संतराम जैस्वाल (५०) आणि अंशिका जैस्वाल (७) यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ठाणे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर सुनीता जैस्वाल (३८), शिवम जैस्वाल (१४), सतीश जैस्वाल (२४) आणि सुशी जैस्वाल (१५) यांच्यावर सध्या शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची अधिकृत माहिती शहापूर पोलिसांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य महेंद्र शिंदे, सुनील करवर, भरत धोंगडे, रुपेश भवारी, भास्कर डिगोरे आणि गणेश शिंदे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले. कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात अडकलेली निष्पाप लहान मुले आणि इतर भाविकांचे मृतदेह बाहेर काढताना खुद्द मदत पथकातील कर्मचाऱ्यांनाही अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर शहापूरचे पोलिस निरीक्षक विलास कदम, महामार्ग पोलिस उपनिरीक्षक अशोक बी. पवार आणि पोलिस हवालदार संजय आवटे यांनी तातडीने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. महामार्गाच्या कडेला तीन वर्षांपूर्वी आगीत खाक झालेला ट्रकचा सांगाडा प्रशासनाने वेळेवर हटवला असता, तर कार त्यावर आदळली नसती आणि हा जीवघेणा अनर्थ सहज टळला असता, असा तीव्र संताप व्यक्त करत स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षावर बोट ठेवले आहे.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दापोलीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय अखेर कार्यान्वित; दापोली, खेड आणि मंडणगडवासीयांची पायपीट थांबणार!

Gramin Varta
2 Min Read

दागिन्यांसाठी केला मावशीचा खून; ४० दिवसांनी भाच्याच्या कृत्याचा पर्दाफाश

Gramin Varta
3 Min Read

दिल्लीत सामूहिक अत्याचारानंतर मुलीची हत्या

Gramin Varta
2 Min Read

अभिषेक शर्मा टी-२० सामन्यात सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय फलंदाज

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमसाठी ‘चलो दिल्ली’; १ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन

4 Min Read
महाराष्ट्र

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंचा दुसरा अर्जही फेटाळला

3 Min Read
महाराष्ट्र

१९ जिल्ह्यांत पाऊस लांबल्याने राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर; पंचनाम्यांपूर्वीच बळीराजा हवालदिल

2 Min Read
महाराष्ट्र

दहावी-बारावीच्या परीक्षांचे बिगुल वाजले; राज्य मंडळाकडून संभाव्य तारखांचा कालावधी जाहीर

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?