ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर : तळगाव येथे गोवा बनावट दारूचा कारखाना उध्वस्त; कोट्यवधींचा बनावट मद्यसाठा जप्त; दोन आरोपींना पाच दिवसांची कोठडी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर : तळगाव येथे गोवा बनावट दारूचा कारखाना उध्वस्त; कोट्यवधींचा बनावट मद्यसाठा जप्त; दोन आरोपींना पाच दिवसांची कोठडी
राजापूर

राजापूर : तळगाव येथे गोवा बनावट दारूचा कारखाना उध्वस्त; कोट्यवधींचा बनावट मद्यसाठा जप्त; दोन आरोपींना पाच दिवसांची कोठडी

Gramin Varta
Last updated: September 17, 2026 6:39 pm
Gramin Varta
86 Views
Share

राजापूर (तुषार पाचलकर): राजापूर तालुक्यातील तळगाव येथे हॉटेल श्री स्वामी समर्थच्या मागील खोलीत सुरू असलेल्या गोवा बनावट दारूच्या अवैध बॉटलिंग अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने जोरदार छापा टाकला. या कारवाईत सुमारे १ कोटी ५ लाख ८१ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयित आरोपींना राजापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी, सिंधुदुर्ग भरारी पथक आणि कणकवली विभागाच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे तळगाव येथील हॉटेल श्री स्वामी समर्थच्या मागील खोलीवर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान खोलीत लपवून ठेवलेले रॉयल ब्लू व्हिस्कीचे ५६ बॉक्स, दोन प्लास्टिक कॅनमध्ये ठेवलेले ६० लिटर तयार मद्य, तसेच अत्याधुनिक बॉटलिंग मशीन जप्त करण्यात आली. याशिवाय टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड मेन्शन हाऊस अशी छापील ८६ हजार ४०० बुचे, ओशियन रॉक प्रीमियम ग्रेन व्हिस्कीच्या लेबलचे रोल, ८६ हजार ४०० रिकाम्या बाटल्या, काचेच्या बाटल्या, पाण्याच्या टाक्या आणि इतर बॉटलिंग साहित्यासह दोन मोबाईल जप्त करण्यात आले.

या प्रकरणी जागेचा मालक दिनेश शांताराम जैतापकर (रा. तळगाव, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) आणि चंदन ऊर्फ शंकर बाळू पाटील (रा. कुट्टालिन, फ्रान्सिसवाडी, पणजी, गोवा) या दोघांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना राजापूर न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी दोन्ही आरोपींना ५ दिवसांची कोठडी मंजूर केली आहे.

सदर धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास भरारी पथक रत्नागिरीचे निरीक्षक अमित पाडळकर करत आहेत. तसेच जिल्ह्यात कोठेही अशा प्रकारे अवैध दारूची निर्मिती, वाहतूक अथवा विक्री होत असल्यास नागरिकांनी तात्काळ उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Total Visitors :

5428503
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

एसआयआर प्रक्रिया रद्द करून नव्याने करा; बॅलेट पेपरसाठी सर्व पक्षांनी आंदोलन उभारावे – राज ठाकरे

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत ७ ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ जप्त; दोघांवर एनडीपीएसअंतर्गत गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत भव्य सेमीकंडक्टर पार्कची घोषणा; जपानच्या ‘हिटाची’ आणि अमेरिकेच्या ‘केएलए’ कंपन्यांशी जागतिक करार

Gramin Varta
2 Min Read

आरवलीच्या राजाला आज भावपूर्ण निरोप; ‘उत्कर्ष तरुण मित्र मंडळा’च्या वतीने महाप्रसाद आणि विसर्जन सोहळ्याची जय्यत तयारी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

अनुस्कुरा घाटात ब्रेक फेल झाल्याने टेम्पो पलटी; २० प्रवाशांचा थोडक्यात बचाव

1 Min Read
राजापूर

साखरीनाटे डोंगर जेटीचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

2 Min Read
राजापूर

उल्का विश्वासराव यांच्या पुढाकाराने बांबू शेतीला नवी दिशा; राजापूर-लांजातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून नवी दिशा

2 Min Read
राजापूर

राजापूर: एसटी बसमधून महिलेच्या बॅगेतील अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?