ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा: वाकेड घाटात ‘बर्निंग कार’चा थरार! स्कॉर्पिओच्या धडकेनंतर ऑरा कारने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा: वाकेड घाटात ‘बर्निंग कार’चा थरार! स्कॉर्पिओच्या धडकेनंतर ऑरा कारने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली
लांजा

लांजा: वाकेड घाटात ‘बर्निंग कार’चा थरार! स्कॉर्पिओच्या धडकेनंतर ऑरा कारने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

Gramin Varta
Last updated: September 19, 2026 10:13 am
Gramin Varta
31 Views
Share

लांजा/ अरबाज नेवरेकर: मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात होऊन ऑरा कारने पेट घेतल्याने ‘बर्निंग कार’चा थरार पाहायला मिळाला. उभ्या असलेल्या ऑरा कारला स्कॉर्पिओने जोरदार धडक दिल्यानंतर ही आग लागली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी ऑरा कार (MH 48 GQ 3557) अपघातामुळे महामार्गाच्या कडेला उभी होती. त्याचवेळी गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओ कारने (MH 47 BT 8006) उभ्या असलेल्या ऑरा कारला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ऑरा कारने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच आगीने संपूर्ण कारला वेढा दिला आणि पाहता पाहता कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडून बेचिराख झाली.

अपघातानंतर वाहनातील प्रवाशांनी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारळकर, पोलीस अंमलदार नासिर नावळेकर, स्वप्नील कदम, विलास जाधव आणि सचिन बळीप यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच महामार्ग पोलिस देखील हजर झाले.राजापूर नगरपरिषद अग्निशमन दलाच्या जवानांनीही तत्काळ घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा करून ऑरा कारला लागलेली आग आटोक्यात आणली.

या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

महाराष्ट्राची कन्या स्वीडनच्या संसदेत; कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी नीला विखे पाटील खासदारपदी

Gramin Varta
2 Min Read

ग्राहक चळवळीत सहभागी होण्यासाठी ग्राहक पंचायत कार्यात सहभाग घ्यावा : सत्यवान कोत्रे

Gramin Varta
2 Min Read

वाटद एमआयडीसीतील डिफेन्स क्लस्टरचा पुनर्विचार होणार

Gramin Varta
2 Min Read

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची देशभरात ‘महामोहीम’; संगमेश्वर तालुक्यातील बामणोली गावाची विशेष निवड

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा : दारूच्या नशेत विहिरीत पडून प्रौढाचा मृत्यू

3 Min Read
लांजा

लांजा: धुंदरेत खुराड्यात शिरला ९ फुटी अजगर; सर्पमित्रांनी केली सुखरूप सुटका

1 Min Read
लांजा

पत्रकार प्रविण कांबळे लिखित-दिग्दर्शित ‘नाडा’ एकांकिकेने मुंबईकरांची मने जिंकली

2 Min Read
लांजा

लांजा: उड्डाणपुलावर भरधाव कारच्या धडकेत मजुराचा जागीच मृत्यू; चालक घटनास्थळावरून पसार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?