ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘देवाजीच्या दारी आज रंगला अभंग’; प्रादेशिक मनोरुग्णालयात भक्तीचा रंग
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘देवाजीच्या दारी आज रंगला अभंग’; प्रादेशिक मनोरुग्णालयात भक्तीचा रंग
रत्नागिरी

‘देवाजीच्या दारी आज रंगला अभंग’; प्रादेशिक मनोरुग्णालयात भक्तीचा रंग

Gramin Varta
Last updated: September 21, 2026 4:29 pm
Gramin Varta
21 Views
Share

रत्नागिरी : टाळ-मृदंगाचा निनाद, अभंगांचे सूर आणि विठ्ठलनामाचा गजर… या भक्तिमय वातावरणात प्रादेशिक मनोरुग्णालयातील उपचारार्थींनी गणेशोत्सवाला अनोखा रंग दिला. ‘टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग…’ या अभंगाने सुरू झालेल्या कार्यक्रमात उपचारार्थींनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. त्यामुळे मनोरुग्णालयाच्या परिसरात काही काळ पंढरी अवतरल्याचा अनुभव उपस्थितांना आला.

जिल्हा माहिती कार्यालयाच्या लोकसंवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमात उपचारार्थींनी विविध अभंग, भक्तिगीते आणि गणेशवंदना सादर केली. संत तुकडोजी महाराजांच्या ‘प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी…’ या अभंगातून सामाजिक विषमतेचा प्रश्न मांडण्यात आला. तर ‘देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझिया गळा’ या भक्तिगीताने वातावरण अधिकच भक्तिमय झाले. ‘कशाला जाता दूर, घरातच पंढरपूर’ या गीतातून भक्तीची अनुभूती आपल्या मनातच शोधण्याचा संदेश देण्यात आला.

गणरायाच्या वंदनेवर उपचारार्थींनी केलेल्या सादरीकरणालाही उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टाळ-मृदंगाच्या तालावर सहभागी झालेल्या उपचारार्थींनी केवळ कलागुणांचे दर्शन घडविले नाही, तर उपचार प्रक्रियेत आनंद, कला, संगीत आणि सामाजिक सहभागाचे महत्त्वही अधोरेखित केले.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरिणाक्षी गोसावी आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. उपचारार्थींना केवळ रुग्ण म्हणून न पाहता त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देत आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टिकोनातून अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमामुळे उपचारार्थी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित नागरिक यांच्यातील संवाद अधिक मोकळा झाला. भक्तिगीतांच्या माध्यमातून उपचारार्थींनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थितांना भावूक केले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मनोरुग्णालयाच्या आवारात साकारलेला हा भक्तिमय सोहळा उपचारार्थींच्या मनातील आनंद आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ देणारा ठरला.

Total Visitors :

5427461
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

संरक्षण क्षेत्रात स्वदेशीचा नवा अध्याय; हवाई दलाच्या ताफ्यात ‘तेजस’सह ‘HTT-40’ दाखल, नागरी उड्डाणासाठी ‘ध्रुव NG’ सज्ज

Gramin Varta
2 Min Read

मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलवसुलीविरोधात जनआक्रोश समितीची उच्च न्यायालयात धाव; जनहित याचिका करणार दाखल 

Gramin Varta
2 Min Read

ग्राहक चळवळीत सहभागी होण्यासाठी ग्राहक पंचायत कार्यात सहभाग घ्यावा : सत्यवान कोत्रे

Gramin Varta
2 Min Read

10 Tech Innovations Set to Reshape the World As We Know It

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीत पावसाळा संपण्यापूर्वीच उन्हाचा कडाका; ऐन सप्टेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चे चटके

2 Min Read
रत्नागिरी

मांडवी समुद्रकिनाऱ्यावर ‘कोकण सागर तट स्वच्छता अभियान’ संपन्न;2.5 टन कचरा संकलित

3 Min Read
रत्नागिरी

दापोलीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय अखेर कार्यान्वित; दापोली, खेड आणि मंडणगडवासीयांची पायपीट थांबणार!

2 Min Read
रत्नागिरी

शिपाई पदाची भरती प्रक्रिया रखडली; अंतिम मुदतीनंतर ६८ दिवस उलटूनही नियुक्ती नाही

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?