ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: गणपती सुट्टीत शिक्षक दाम्पत्य गावी गेले अन् पाचलमध्ये घरफोडी; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » गणपती सुट्टीत शिक्षक दाम्पत्य गावी गेले अन् पाचलमध्ये घरफोडी; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास
राजापूर

गणपती सुट्टीत शिक्षक दाम्पत्य गावी गेले अन् पाचलमध्ये घरफोडी; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

Gramin Varta
Last updated: September 22, 2026 10:40 am
Gramin Varta
1.7k Views
Share

राजापूर : गणपती सुट्टीच्या कालावधीत शिक्षक दाम्पत्य आपल्या मूळ गावी गेले असताना त्यांच्या पाचल-विद्यानगर येथील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी केली. घरातील कपाटे व तिजोरी फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ६ लाख ५० हजार १८५ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पाचल परिसरात खळबळ उडाली आहे.

पाचल येथील सरस्वती विद्या मंदिरमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सन्नू पिरजादे आणि त्यांचे पती मुसाअल्ली गुलाब पिरजादे (वय ५६) हे तुळसवडे हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गणपती सुट्टीच्या निमित्ताने पिरजादे दाम्पत्य १२ सप्टेंबर रोजी आपल्या मूळ गावी गेले होते. याच कालावधीत पाचल-विद्यानगर येथील त्यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्याने डल्ला मारला.

अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा कोणत्यातरी हत्याराच्या सहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी व लाकडी कपाटांचे दरवाजे तसेच तिजोरी उघडून त्यामधील सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण आणि रोख रक्कम लंपास केली. घरातील मौल्यवान ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर पिरजादे कुटुंबीयांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश कदम, राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव आणि पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी फिंगरप्रिंट तज्ज्ञ, डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास करण्यात आला आहे.

चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे घडण, सोन्याचे ब्रेसलेट, डायमंड मंगळसूत्र, डायमंडचे कानातील टॉप्स, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे कानातले, सोन्याचा हार, कलर स्टोन्स नेकलेस, सोन्याच्या अंगठ्या, चांदीच्या पैंजणाचा जोड तसेच १२ हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे. या सर्व ऐवजाची एकूण किंमत ६ लाख ५० हजार १८५ रुपये असल्याचे पोलिसांत दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(क), ३३१(३) व ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल असून, घरफोडी करणाऱ्या चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. गणपती सुट्टीच्या काळात घर बंद असल्याची संधी साधून ही चोरी करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.पुढील तपास राजापूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे करीत आहे

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

जयगड-नांदिवडे मार्गावर बेदरकारपणे क्रेन चालवणे भोवले; उत्तर प्रदेशातील चालकावर जयगड पोलिसांत गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

मालगुंड ग्रामपंचायतीत जयगड पोलिसांचा सायबर जनजागृती उपक्रम; ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत नागरिकांशी थेट संवाद

Gramin Varta
2 Min Read

गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास होणार सुकर; गृहराज्यमंत्र्यांच्या पुढाकारातून ‘खेड-दिवा’ मेमू स्पेशल धावणार मोफत

Gramin Varta
2 Min Read

शिक्षिकेच्या बदलीसाठी दीड लाखांची लाच घेताना रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा स्वीय सहाय्यक रंगेहात जाळ्यात

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

Smart Solutions in Mobile Production Advanced Strategies for Efficiency

7 Min Read
राजापूर

जमीन संपादन व मोबदला वाटपात गैरव्यवहार; एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया थांबवा : मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर

2 Min Read
राजापूर

साखरीनाटे डोंगर जेटीचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

2 Min Read
राजापूर

उल्का विश्वासराव यांच्या पुढाकाराने बांबू शेतीला नवी दिशा; राजापूर-लांजातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून नवी दिशा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?