ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा: उड्डाणपुलावर भरधाव कारच्या धडकेत मजुराचा जागीच मृत्यू; चालक घटनास्थळावरून पसार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा: उड्डाणपुलावर भरधाव कारच्या धडकेत मजुराचा जागीच मृत्यू; चालक घटनास्थळावरून पसार
लांजा

लांजा: उड्डाणपुलावर भरधाव कारच्या धडकेत मजुराचा जागीच मृत्यू; चालक घटनास्थळावरून पसार

Gramin Varta
Last updated: September 22, 2026 6:46 pm
Gramin Varta
807 Views
Share

लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा शहर उड्डाणपुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम सुरू असताना भरधाव महिंद्रा कारने काम करणाऱ्या मजुराला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उड्डाणपुलावरील पिअर क्रमांक ३ जवळ ही घटना घडली. गोपाल मुरमु (वय ४५, रा. द्वारहट्टा, जि. हुगळी, पश्चिम बंगाल) असे मृत मजुराचे नाव आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सीमा इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत सुरू आहे. प्रकल्प व्यवस्थापक राजशेखरन मुरुगन यांच्या देखरेखीखाली गोपाल मुरमु हे लांजा उड्डाणपुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम करत होते. याचवेळी महिंद्रा कार क्रमांक केए ०३ एसी ३६०० घेऊन मौला कासम शेख (वय ३८, मूळ रा. अक्कलकोट, सोलापूर, सध्या रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) हा उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने जात होता. रस्त्यावरील कामाची परिस्थिती व सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवत त्याने मुरमु यांना जोरदार धडक दिली.

धडकेनंतर गोपाल मुरमु गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने जखमीला मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी प्रकल्प व्यवस्थापक राजशेखरन मुरुगन यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चालक मौला कासम शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४(ब)/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून पाहणी केली असून गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेचे चित्रीकरणही करण्यात आले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम ३५(३) अन्वये आरोपीला नोटीस बजावण्यात आली आहे.

लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापुरात बंद घर फोडून ६७ हजारांचा ऐवज लंपास

Gramin Varta
1 Min Read

Traversing the Wonders of Earth’s Diverse and Complex Ecosystems

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

मराठवाड्यात पावसाची ३१ टक्के तूट; ५,५६० गावांवर संकट

Gramin Varta
1 Min Read

एसटी प्रवासात आदलाबदल झालेली लाखोंच्या दागिन्यांची बॅग राजापूर पोलिसांच्या तत्परतेमुळे काही तासांत हस्तगत

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा : दारूच्या नशेत विहिरीत पडून प्रौढाचा मृत्यू

3 Min Read
लांजा

वयोमानामुळे जमीन खोदणे झाले कठीण; पाईपलाईन दुरुस्तीसाठी ज्येष्ठ नागरिकाच्या मदतीला पोलीस अंमलदार

2 Min Read
लांजा

लांजा तालुक्यात १३ हजार ५८८ बाप्पांना भावपूर्ण निरोप

1 Min Read
लांजा

लांजा शहरासह तालुक्यात गणरायाचे वाजतगाजत आगमन; भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाला सुरुवात

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?