ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेडमध्ये आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त भव्य सैनिक संकुल उभारणीला प्रशासकीय गती
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेडमध्ये आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त भव्य सैनिक संकुल उभारणीला प्रशासकीय गती
खेड

खेडमध्ये आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त भव्य सैनिक संकुल उभारणीला प्रशासकीय गती

Gramin Varta
Last updated: September 26, 2026 8:10 am
Gramin Varta
75 Views
Share

खेड: खेड तालुक्यातील आजी-माजी सैनिक, वीरमाता-पिता, वीरपत्नी, विधवा तसेच सैनिकांच्या पाल्यांसाठी सर्व आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असे भव्य सैनिक संकुल उभारण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे आजी-माजी सैनिक संघटना खेड यांच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. पावशे यांनी येथील जुन्या इमारतींची प्रत्यक्ष स्थळपाहणी केली.

खेड येथे सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी सन १९४६ मध्ये उभारण्यात आलेली सैनिकी मुलांचे वसतिगृह व सैनिक विश्रामगृह ही वास्तू ऐतिहासिक महत्त्व जपणारी ठरली आहे. प्रदीर्घ काळ या वास्तूंचा उपयोग सैनिकी परिवारांना होत आला असला, तरी सध्या या दोन्ही इमारती अत्यंत जीर्ण व मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे या जुन्या इमारतींची पुनर्बांधणी करून त्याच जागेवर सर्वसमावेशक सैनिक संकुल उभे करावे, अशी आग्रही मागणी सैनिक संघटनेकडून करण्यात आली होती. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील सैनिकांच्या अडीअडचणी, समस्या, कुटुंबीयांना आवश्यक सुविधा आणि पाल्यांच्या शैक्षणिक गरजा दोन्ही नेत्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने अभियंता पावशे यांनी इमारतींची सध्याची स्थिती, उपलब्ध भूखंड आणि पुनर्बांधणीच्या तांत्रिक शक्यतांची बारकाईने पाहणी केली.

प्रस्तावित सैनिक संकुल केवळ निवास अथवा विश्रामगृह मर्यादित न राहता, तेथे शासकीय योजनांची माहिती, प्रशासकीय मदत, वीरमाता-पिता, वीरपत्नी व विधवा यांच्यासाठी कल्याणकारी सुविधा आणि पाल्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणारे सर्वसमावेशक सुविधा केंद्र म्हणून विकसित करण्याची भूमिका मांडण्यात आली आहे. कदम पिता-पुत्रांच्या पुढाकारामुळे या जुन्या मागणीला प्रशासकीय पातळीवर गती मिळाल्याने आजी-माजी सैनिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या प्रत्यक्ष स्थळपाहणीच्या वेळी खेड नगरपालिकेचे नगरसेवक श्री. निकेतन पाटणे, नगरसेविका सौ. रसिका ताई खेडेकर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक श्री. सुनील कदम, आजी-माजी सैनिक संघटना खेडचे अध्यक्ष सुभेदार मेजर डी. डी. आखाडे, उपाध्यक्ष श्री. काशीराम सकपाल, सचिव श्री. निलेश मोरे, खजिनदार श्री. निकम, सैनिक संघटना शिवतरचे अध्यक्ष श्री. शिवाजी मोरे, श्री. सूर्यकांत मोरे, श्री. बळीराम मोरे यांच्यासह श्री. दौलत चव्हाण, श्री. दिलीप भोसले (तिसंगी), श्री. जंगम, श्री. मोरे (ऐनवली), श्री. खेडेकर (खेड), श्री. जाधव (धवडे) आणि अनेक माजी सैनिक उपस्थित होते. आता या प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव, प्रशासकीय मंजुरी आणि आवश्यक निधीची तरतूद वेळेत पूर्ण होऊन देशसेवेत सर्वस्व अर्पण करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी हे सुसज्ज संकुल लवकरात लवकर प्रत्यक्षात उभे राहावे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Gramin Varta
2 Min Read

सावर्डे : माहेरून पैसे आणण्यास नकार देताच पत्नीला दांडक्याने मारहाण करून पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी

Gramin Varta
1 Min Read

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातही चिपळूण पोलिसांची कर्तव्यतत्परता; रिक्षाचालकाचा हरवलेला मोबाईल शोधून केला सुपूर्द

Gramin Varta
2 Min Read

शालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत
अजीजा दाऊद नाईक हायस्कूलचे वर्चस्व

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

खेड

Best beaches in the UK for the Perfect Sandy Getaway

Sponsored by
Sponsored by
खेड

खेड तालुक्यातील सहकार क्षेत्राचा स्तुत्य उपक्रम; ‘सेवा संकल्प अभियाना’तून असोंड आश्रमशाळेला दोन महिन्यांचे किराणा सामान सुपूर्द

2 Min Read
खेड

Start a Digital Marketing Website for your Service

7 Min Read
खेड

खेड: चाकाळे येथे जुन्या वैमनस्यातून भरदिवसा रक्तरंजित राडा; बांबूच्या काठीने बेदम मारहाण करत एकाला केले गंभीर जखमी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?