ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मंडणगड : पत्नीचे फोटो काढल्याच्या संशयावरून पत्नीच्या फोटोवरून तरुणाला बेदम मारहाण; धमकीच्या धसक्याने विष प्राशनाचा प्रयत्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मंडणगड : पत्नीचे फोटो काढल्याच्या संशयावरून पत्नीच्या फोटोवरून तरुणाला बेदम मारहाण; धमकीच्या धसक्याने विष प्राशनाचा प्रयत्न
मंडणगड

मंडणगड : पत्नीचे फोटो काढल्याच्या संशयावरून पत्नीच्या फोटोवरून तरुणाला बेदम मारहाण; धमकीच्या धसक्याने विष प्राशनाचा प्रयत्न

Gramin Varta
Last updated: September 24, 2026 10:48 am
Gramin Varta
141 Views
Share

मंडणगड: पत्नीचे फोटो काढल्याच्या संशयावरून दोन सख्ख्या भावांनी चुलत भावावर जीवघेणा हल्ला चढवत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कादवण येथे घडली आहे. आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत झालेली बेदम मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमकीमुळे प्रचंड मानसिक तणावाखाली गेलेल्या २७ वर्षीय तरुणाने दुसऱ्याच दिवशी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कादवण येथील रहिवासी सुरज संभाजी सोंडकर (वय २७) हे १८ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास आई अनुसया, वडील व बहिणीसह घरात उपस्थित होते. त्यावेळी त्यांचे चुलत भाऊ मिलिंद सोंडकर (वय ३५) व मनोज सोंडकर (वय ४१) यांनी घरात अनाधिकाराने प्रवेश केला. त्यांनी थेट सुरजच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत, “तू माझ्या बायकोचे फोटो का काढलेस? तिच्याशी तुझे काय संबंध आहेत?” असा जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली.

वाद विकोपास गेल्यानंतर दोघांनी सुरजला लाकडी काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. कुटुंबीयांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना न जुमानता सुरजला रक्तबंबाळ करण्यात आले व जाताना जीवे मारण्याची उघड धमकी देण्यात आली.

या गंभीर मारहाणीमुळे आणि धमकीच्या दहशतीमुळे सुरज प्रचंड मानसिक धक्क्यात होता. या भीतीपोटी त्याने १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात म्हशींसाठी वापरले जाणारे विषारी औषध प्राशन केले. कुटुंबीयांच्या ही बाब तात्काळ लक्षात आल्याने त्यांनी सुरजला तत्परतेने रुग्णालयात दाखल केले. वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी जखमी तरुणाची आई अनुसया संभाजी सोंडकर (वय ४५) यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली आहे. त्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी मिलिंद सोंडकर व मनोज सोंडकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१) (धोकादायक हत्यारांनी दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान करणे) आणि ३(५) (सामूहिक गुन्हेगारी कृत्य) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5427461
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दुष्काळाचं संकट विचित्र; योजना, विकास प्रकल्पांचा निधी दुष्काळासाठी वापरावा – उद्धव ठाकरे

Gramin Varta
4 Min Read

वंदे मातरम याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

Gramin Varta
1 Min Read

The Must-Have Application of the Year Charts with Innovation

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

शाळेतून पत्नीला घेऊन परतताना काळाचा घाला;उभ्या पिकअपला दुचाकीची धडक, लेकीसह बापाचा अंत

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

मंडणगड

पाणीपट्टीवरून मुरादपूरच्या सरपंचांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; मंडणगड पोलिसांत गुन्हा

1 Min Read
मंडणगड

मंडणगड: हातात चाकू घेऊन गावात दहशत निर्माण करणाऱ्यावर गुन्हा

1 Min Read
मंडणगड

मंडणगड : आतकोळ फाट्यावर भरधाव कारची एसटी बसला जोरदार धडक; दोघे जखमी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?