ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: शिवाजी पार्कवरील सीजेपीच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; अभिजीत दीपके यांचा २ ऑक्टोबरला थेट ‘जेल भरो’चा इशारा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » शिवाजी पार्कवरील सीजेपीच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; अभिजीत दीपके यांचा २ ऑक्टोबरला थेट ‘जेल भरो’चा इशारा
महाराष्ट्र

शिवाजी पार्कवरील सीजेपीच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; अभिजीत दीपके यांचा २ ऑक्टोबरला थेट ‘जेल भरो’चा इशारा

Gramin Varta
Last updated: September 28, 2026 8:23 am
Gramin Varta
33 Views
Share

मुंबई : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची संशयास्पद कार्यपद्धती आणि वादग्रस्त एसआयआर प्रक्रियेविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत संयुक्त महाजनमोर्चा काढणार असतानाच, तत्पूर्वी २ ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) पुकारलेल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा दिला नाही, तर महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर मुंबईतून देशव्यापी आंदोलन छेडण्याचा थेट इशारा सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिला होता. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय संघटन प्रमुख अजिंक्य शिंदे यांनी ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली होती; मात्र पोलिसांनी ती फेटाळल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

उच्च न्यायालयाचा जनहित याचिका (PIL) क्रमांक ११६/२००९ मधील दिनांक ०४/०१/२०१३ चा निर्णय आणि महाराष्ट्र शासनाने २०/०१/२०१६ रोजी काढलेल्या आदेशानुसार शिवाजी पार्क येथे कोणत्याही प्रकारच्या जमावासाठी अथवा कार्यक्रमासाठी परवानगी देण्याचे कायदेशीर अधिकार पोलिसांना नाहीत; त्यामुळेच हा अर्ज नाकारण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अर्जदार अजिंक्य शिंदे यांना वस्तुस्थितीची कल्पना देण्यात आली असून मुंबई शहरातील इतर पर्यायी जागांचा शोध घेऊन नव्याने अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे; अशा अर्जाचा नियमानुसार योग्य तो विचार केला जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, प्रशासकीय पातळीवर परवानगी नाकारल्यानंतर अभिजीत दीपके यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबईत ‘जेल भरो आंदोलन’ सुरू करण्याचा इशारा सोशल मीडियावर पोस्ट करून दिला आहे. नागरिकांचा सनदशीर आवाज दाबण्यासाठी वापरले जाणारे असे प्रकार पूर्णपणे अस्वीकार्य आहेत, असा आरोप करत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार नाकारला गेल्यास २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी सीजेपी मुंबईभर तीव्र जेल भरो आंदोलन छेडेल, असा थेट इशारा दीपके यांनी दिला आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापुरात चुलत्याला शिवीगाळ करत पुतण्याकडून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

Gramin Varta
2 Min Read

नवरात्र, दिवाळी, छठपूजेसाठी विशेष रेल्वेगाड्या; पुणे विभागातून २१६ फेऱ्या

Gramin Varta
1 Min Read

वनप्लसचा बजेट स्मार्टफोन ‘एन६ लाइट ४जी’ लाँच

Gramin Varta
3 Min Read

‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत रत्नागिरी पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी धडक; १६ गुन्हे दाखल करत २२ जणांना ठोकल्या बेड्या

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

मुंबईत मनोरी किनाऱ्यावर अडकलेल्या संशयास्पद जहाजात चार जणांचा गुदमरून गूढ मृत्यू

2 Min Read
महाराष्ट्र

दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार

3 Min Read
महाराष्ट्र

तीन महिने ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून ११ कोटींहून अधिक रकमेची लूट; सीबीआयकडून दोघांना बेड्या

1 Min Read
महाराष्ट्र

बीआयएसने सोन्याच्या हॉलमार्किंग शुल्कात ७५ रुपयांपर्यंत केली वाढ, नवीन दर लागू

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?