ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत मोबाईल हॅक करून ५.६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत मोबाईल हॅक करून ५.६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक
रत्नागिरी

रत्नागिरीत मोबाईल हॅक करून ५.६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Gramin Varta
Last updated: September 28, 2026 11:25 am
Gramin Varta
158 Views
Share

रत्नागिरी : शहरातील तेली आळी येथील ज्यतिका अपार्टमेंटमध्ये कार्यालयात असलेल्या चार्टर्ड अकाऊटंटची तब्बल ५ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैसे इतक्या रकमेची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या वडिलांचा मोबाईल हॅक करून त्याआधारे कॅनरा बँकेचे डेबिट कार्ड मिळवून घेतले. त्यानंतर संयुक्त बँक खात्यातून २ लाख रुपये परस्पर ट्रान्सफर करण्यासह मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून ३ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैशांचे क्रेडिट कार्ड बिल भरून घेतल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी विपिन रसिकलाल शहा (वय ५७, व्यवसाय चार्टर्ड अकाऊटंट, रा. बन्सी बंगला, पार्क ओपल, शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७५/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६ (क), ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८.१४ ते ८.३७ वाजण्याच्या सुमारास ही ऑनलाइन फसवणूक घडली. फिर्यादी विपिन शहा हे तेली आळी येथील ज्यतिका अपार्टमेंटमधील त्यांच्या कार्यालयात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या वडिलांचा मोबाईल हॅक केल्याचा आरोप आहे. या मोबाईलचा गैरवापर करून संबंधित अज्ञात व्यक्तीने कॅनरा बँकेचे डेबिट कार्ड इश्यू करून घेतले.

त्यानंतर त्या डेबिट कार्डचा वापर करून फिर्यादी यांच्या कॅनरा बँकेतील संयुक्त खात्यातून २ लाख रुपये परस्पर ट्रान्सफर करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता अज्ञात व्यक्तीने मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून ३ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैसे इतक्या रकमेचे क्रेडिट कार्ड बिलदेखील भरून घेतले. अशा प्रकारे एकूण ५ लाख ६६ हजार ४४१ रुपये ९ पैसे रकमेची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर २७ सप्टेंबर रोजी दुपारी २.१९ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी अद्याप अज्ञात असून, मोबाईल हॅकिंग, डेबिट कार्डचा वापर आणि ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या फसवणुकीचा पोलीस तपास सुरू आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दुष्काळग्रस्तांना दिलासा! शेती कर्ज वसुलीला स्थगिती, शासन निर्णय जाहीर

Gramin Varta
2 Min Read

‘ग्रामीण वार्ता’च्या बातमीची प्रशासनाकडून दखल; पालशेत-जोईलवाडीत अखेर पाणीपुरवठा पूर्ववत

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीत ७ ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ जप्त; दोघांवर एनडीपीएसअंतर्गत गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

दिशा सालियन प्रकरणात सीबीआयच्या एफआयआरनंतर नवा कायदेशीर संघर्ष; सतीश सालियन थेट ‘मातोश्री’वर बजावणार मानहानीची नोटीस

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत जिंदल विद्या मंदिरचे घवघवीत यश; दोघांची विभागीय स्तरावर निवड

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: बोटीवर स्वयंपाक करताना गॅसचा भडका; गंभीर भाजलेल्या खलाशाचा उपचारादरम्यान मृत्यू

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा होणार

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत मध्यरात्री भरधाव मोटारीचा थरार; थिबा पॅलेस मार्गावर वाहनासह बंगल्याच्या कंपाऊंडला जोरदार धडक

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?