ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर; अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर; अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी
रत्नागिरी

महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर; अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 8:45 am
Gramin Varta
62 Views
Share

रत्नागिरी : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह प्रमुख रस्त्यांवर मोकाट गाई-बैल व इतर जनावरांचा वावर वाढल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक रस्त्यावर येणाऱ्या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून, वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच मानवी जीवितालाही धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या शिवानी सावंत यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.

अपघात घडल्यानंतर मदत करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सावंत यांनी पत्रात नमूद केले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक ठिकाणी सुरक्षा कुंपण, आवश्यक सूचना फलक तसेच पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने मोकाट जनावरे पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. रस्त्यावर जनावरे मोकाट सोडणाऱ्या पशुपालकांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची गरज असल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले.

या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली NHAI, पोलीस, पशुसंवर्धन विभाग आणि संबंधित स्थानिक प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्यात यावी. या बैठकीत महामार्गावरील मोकाट जनावरांचा प्रश्न, सुरक्षा व्यवस्था आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी शिवानी सावंत यांनी केली आहे.

मानवी जीविताबरोबरच मुक्या जनावरांचे संरक्षणही महत्त्वाचे असून, प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

खेड: भेलसई पुलावर मोटारसायकल कठड्यावर आदळली; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

Gramin Varta
2 Min Read

मंडणगडात भरदिवसा घरफोडी; कपाटातील लॉकर फोडून सव्वादोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Gramin Varta
1 Min Read

चिपळूणमध्ये किरकोळ कारणावरून जावई व सासऱ्याला भररस्त्यात बेदम मारहाण; कोळकेवाडीतील चार जणांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

गणपती सजावटीदरम्यान विजेचा धक्का; संगमेश्वरातील ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात दुचाकी घसरून अपघात; प्रौढ जखमी

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत गांजाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; २ किलो गांजासह एकाला अटक

2 Min Read
रत्नागिरी

निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा वर्तक कुटुंबीयांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव देखावा

2 Min Read
रत्नागिरी

पाली येथे भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?