नाशिक : टीसीएस या आयटी कंपनीमध्ये धर्मांतराच्या प्रकरणात सहभागी झालेले आहे निदाखान आता एका नव्या वादामध्ये सापडली असून तिला नवऱ्याने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची नोटीस दिली आहे या नोटीसीवर कौटुंबिक न्यायालयाने निदाखानीला पुढच्या आठवड्यामध्ये 16 ऑक्टोंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश समस्त द्वारे दिले आहे यामुळे या प्रकरणात निदा खानच्या अडचणी वाढल्या असून नवीन संकटाचा सामना तिला करावा लागणार आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, नाशिकची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या इंदिरानगर परिसरात असलेल्या आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे धर्मांतर आणि लैंगिक छळ केल्याच्या कथित प्रकरणात आरोपी असलेल्या निदा खानसमोर आणखी एक कायदेशीर आव्हान उभे राहिले आहे. यापूर्वी आयटी कंपनीमध्ये सक्तीने धर्मांतर केले प्रकरणी पहिल्यापासूनच वादामध्ये असलेले निदा आता अजूनच घरगुती प्रकरणामुळे अडचणीत सापडलेली आहे.
तिच्यासमोरील घरगुती अडचणी वाढल्या असून याबाबत यावेळी कारण तिचा पती मोईन खानने नाशिक रोड कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. नयायालयाने निदाला समन्स बजावले असून, तिला १६ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात निदाला अटक करण्यात आली होती आणि ती सध्या जामिनावर बाहेर आहे. ती गर्भवती असल्याचे वृत्त आहे. २६ मार्च रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाल्याच्या वृत्तानंतर पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगर येथे शोधून काढले. तपासादरम्यान, पोलिसांनी असा आरोप केला की, निदा फरार असताना एआयएमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी तिला आश्रय दिला होता. पोलिसांनी नंतर पटेल आणि घरमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मोईन खानने घटस्फोटाच्या याचिकेत दिलेली कारणे उघड करण्यात आलेली नाहीत. या प्रकरणामुळे आणि त्यानंतर झालेल्या सार्वजनिक टीकेमुळे निदाच्या वैवाहिक जीवनावर परिणाम झाल्याचे वृत्त आहे.





