ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूण : कळंबस्ते येथे मध्यरात्री संशयास्पदरीत्या लपून बसलेला तरुण पोलिसांच्या जाळ्यात
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूण : कळंबस्ते येथे मध्यरात्री संशयास्पदरीत्या लपून बसलेला तरुण पोलिसांच्या जाळ्यात
चिपळूण

चिपळूण : कळंबस्ते येथे मध्यरात्री संशयास्पदरीत्या लपून बसलेला तरुण पोलिसांच्या जाळ्यात

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 5:01 pm
Gramin Varta
221 Views
Share

चिपळूण  : चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे विठ्ठल मंदिर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा गैरफायदा घेऊन संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चोरी किंवा अनुचित प्रकार करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या या इसमाविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मंगेश लक्ष्मण गमरे (वय ४५ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. कळंबस्ते बौद्धवाडी, ता. चिपळूण) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

या संदर्भात चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक भिकाजी रहाटे (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण पोलिसांचे पथक २७ सप्टेंबरच्या रात्री गस्तीवर असताना, रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मौजे कळंबस्ते येथील विठ्ठल मंदिराजवळ एक व्यक्ती अंधारात संशयास्पदरीत्या स्वतःचे अस्तित्व लपवून उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

गस्तीवरील पोलिसांची चाहूल लागताच त्या इसमाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला जागीच पकडले. सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वीच्या काळात अशा निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी थांबण्याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता, त्याने कोणतीही समाधानकारक माहिती दिली नाही. चोरीच्या उद्देशाने किंवा गुन्हा करण्याच्या इराद्याने तो त्या ठिकाणी दबा धरून बसल्याचे निष्पन्न झाल्याने, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १२२ (क) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5435560
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

पडिक पाण्याच्या टाकीत अडकलेल्या मगरीच्या पिल्लाची सुटका

Gramin Varta
1 Min Read

तळेकांटे येथे डायव्हर्जनचा अंदाज चुकल्याने स्विफ्ट डिझायर गाडीचा अपघात, एक जखमी

Gramin Varta
1 Min Read

ह.भ.प. राजेंद्र महाराज राजेशिर्के यांना ‘राज्यस्तरीय वारकरी रत्न’ पुरस्कार प्रदान

Gramin Varta
1 Min Read

दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६ हजार ७२८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

चिपळूण-कराड मार्गावर बेकायदेशीर गुटख्याची वाहतूक रोखली, १० लाखांहून अधिक मुद्देमालासह वाहन जप्त

1 Min Read
चिपळूण

खडपोली पुलाचे काम अंतिम टप्प्यात; जानेवारीपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार

1 Min Read
चिपळूण

अवघ्या ५० मीटरच्या भरावाअभावी चिपळूणच्या उड्डाणपुलाची प्रतीक्षा लांबली; सणासुदीच्या गर्दीमुळे काम थांबले, जोडरस्ते ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

2 Min Read
चिपळूण

वाशिष्टी नदीपात्रात ८१ वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?