ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६ हजार ७२८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६ हजार ७२८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
महाराष्ट्र

दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६ हजार ७२८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

Gramin Varta
Last updated: October 2, 2026 8:22 am
Gramin Varta
30 Views
Share

मुंबई: दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि मजूर वर्गावर होतो. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांच्या हाताला काम देणे आणि कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी रोजगार हमी योजना विभागाने ६ हजार ७२८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

या माध्यमातून रोजगारनिर्मितीबरोबरच जलसंधारण, शेतीपूरक सुविधा आणि ग्रामीण पायाभूत विकासाला गती देण्यात येणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधतांना दिली.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजना विभाग काम करत असल्याचे सांगून त्यांनी वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाची एकूण ३७५ प्रकारची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. या कामांमधून गावांमध्ये कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करण्यावरही शासन भर देणार आहे.

महाराष्ट्र रोजगार हमी योजना, व्हीबी-जी राम जी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन (ग्रामीण) हमी तसेच संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून विभागनिहाय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामध्ये अमरावती विभागासाठी १ हजार १४५ कोटी रुपये, कोकण विभागासाठी ४८९ कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगर विभागासाठी १ हजार ९४४ कोटी रुपये, नागपूर विभागासाठी ११९ कोटी रुपये आणि पुणे विभागासाठी ८०१ कोटी रुपयांची तरतूद आहे. या निधीत केंद्र शासनाचा ६० टक्के, तर राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग राहणार आहे.

ग्रामीण भागात वैयक्तिक लाभाच्या कामांमध्ये सिंचनाची कामे, गायगोठे, वैयक्तिक फळबाग लागवड, बोअरवेल पुनर्भरण, बांबू लागवड, प्रधानमंत्री आवास योजना, रेशीम उद्योगासाठी शेड बांधकाम आणि कंपोस्ट खड्ड्यांचे बांधकाम यांसह शेतकरी व ग्रामीण कुटुंबांना उपयुक्त ठरणाऱ्या विविध कामांचा समावेश आहे. तर सार्वजनिक लाभाच्या कामांमध्ये सार्वजनिक तलावांची दुरुस्ती व देखभाल, गॅबियन बंधारे, पाझर तलाव, माती बंधारे, आरसीसी तटबंध, शेत-पाणंद रस्ते, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या साठवणूक इमारती आणि बाजार ओटे यांसह जलसंधारण, कृषी व ग्रामीण विकासाशी संबंधित कामे हाती घेण्यात येणार आहेत.

रोजगार हमी योजना विभाग उपलब्ध कामांचा प्रभावी वापर करून जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती करणार आहे. तात्पुरत्या उपाययोजनांपुरते मर्यादित न राहता रोजगारनिर्मितीसोबत जलसंधारण, शेतीपूरक सुविधा आणि ग्रामीण पायाभूत सुविधांना बळकटी देण्यावर शासनाचा भर असल्याचे मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दापोलीत कोट्यवधींच्या वक्फ जमीन घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई; सत्ताधारी राजकीय नेत्यासह ४४ जणांना वक्फ बोर्डाची नोटीस

Gramin Varta
3 Min Read

कळझोंडी उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ६२ ग्रामस्थांनी घेतला लाभ

Gramin Varta
2 Min Read

राजापूर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न

Gramin Varta
2 Min Read

राजापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पाचलच्या सरस्वती विद्यामंदिरचे अजिंक्यपद

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

चिपळूण: प्रा. अजित कदम यांना ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान

1 Min Read
महाराष्ट्र

मुंबई – मडगांव आणि मुंबई – नागपूर दरम्यान ८ साप्ताहिक विशेष गाड्या

2 Min Read
महाराष्ट्र

दहावी-बारावीच्या परीक्षांचे बिगुल वाजले; राज्य मंडळाकडून संभाव्य तारखांचा कालावधी जाहीर

1 Min Read
महाराष्ट्र

टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी हवालदिल

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?