ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दिवेआगर समुद्र दुर्घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’वर थेट सील
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दिवेआगर समुद्र दुर्घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’वर थेट सील
महाराष्ट्र

दिवेआगर समुद्र दुर्घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’वर थेट सील

Gramin Varta
Last updated: October 3, 2026 8:33 am
Gramin Varta
147 Views
Share

परवाना व एनओसीविना सुरू असलेल्या कोचिंग क्लासेसवर नगरपरिषदेचा हातोडा

आळंदी: दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर सहलीदरम्यान आठ विद्यार्थ्यांचा बुडून झालेल्या हृदयद्रावक व दुर्दैवी मृत्यूनंतर खडबडून जागे झालेल्या आळंदी नगरपरिषद प्रशासनाने अत्यंत धडक पाऊल उचलले आहे. या भीषण दुर्घटनेत निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी गेल्यानंतर स्थानिक प्रशासनाने थेट ॲक्शन मोडमध्ये येत विद्यार्थ्यांशी संबंधित आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’ या कोचिंग क्लासला कडक पोलीस बंदोबस्तात सील ठोकले आहे. तपासणीदरम्यान या क्लासेसकडे कोणताही अधिकृत व्यवसाय परवाना तसेच ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

नगरपरिषदेच्या अधिकृत नोंदीनुसार, नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीच्या मालमत्ता क्रमांक जुना ११३७ (नवीन LAN00001729) या इमारतीमध्ये ‘विनर्स अकॅडमी’ या नावाने हा खाजगी कोचिंग क्लास कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय बेधडकपणे चालवला जात होता. नगरपरिषदेच्या अभिलेखांची पडताळणी केली असता, संस्थेने आवश्यक परवानग्या न घेताच कारभार सुरू ठेवल्याचे स्पष्ट झाले. या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेत आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार कर विभाग प्रमुख सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने पोलीस संरक्षणात प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून अकॅडमीच्या इमारतीला टाळे ठोकत ती पूर्णपणे सील केली.

दिवेआगर समुद्रकिनारी घडलेल्या या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेमुळे संपूर्ण आळंदी शहरावर तीव्र शोककळा पसरली असून, अनधिकृत शैक्षणिक संस्थांच्या मनमानी कारभाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने शहरातील इतरही सर्व कोचिंग क्लासेस आणि व्यावसायिक आस्थापनांची सखोल तपासणी मोहीम हाती घेतली आहे. शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांनी नियमानुसार आवश्यक व्यवसाय परवाने, एनओसी व इतर कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करूनच कामकाज चालवावे; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Gramin Varta
2 Min Read

कोकणाच्या हापूससह सर्व आंबा जातींची ई-पीक पाहणीत स्वतंत्र नोंद होणार

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुकेही दुष्काळग्रस्त करण्यासाठी पाठपुरावा; १५ दिवसांत २ हजार बंधारे उभारणार : मंत्री उदय सामंत

Gramin Varta
3 Min Read

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप अखेर स्थगित

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांना दिवाळीपूर्वी थेट खात्यात मदत; शेतकऱ्यांना सरसकट दिलासा देणार : कृषी मंत्री

2 Min Read
महाराष्ट्र

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘द वन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

1 Min Read
महाराष्ट्र

बॉक्स ऑफिसवर सिद्धार्थ-तमन्नाच्या ‘द वन’चा जलवा

1 Min Read
महाराष्ट्र

दुष्काळाचं संकट विचित्र; योजना, विकास प्रकल्पांचा निधी दुष्काळासाठी वापरावा – उद्धव ठाकरे

4 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?