ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: अमेरिकेतील भीषण रस्ते अपघातात भारतीय महिलेचा मृत्यू, पार्थिव मायदेशी आणण्याचा कुटुंबाचा आग्रह
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » अमेरिकेतील भीषण रस्ते अपघातात भारतीय महिलेचा मृत्यू, पार्थिव मायदेशी आणण्याचा कुटुंबाचा आग्रह
देश-विदेश

अमेरिकेतील भीषण रस्ते अपघातात भारतीय महिलेचा मृत्यू, पार्थिव मायदेशी आणण्याचा कुटुंबाचा आग्रह

Gramin Varta
Last updated: October 6, 2026 8:28 am
Gramin Varta
187 Views
Share

हैदराबाद : अमेरिकेच्या मिसुरी राज्यातील सेंट लुईस परिसरात शनिवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका ३१ वर्षीय भारतीय महिलेचा मृत्यू झाला. भरधाव ट्रकने त्यांच्या कारला धडक दिल्याने हा अपघात झाला.मृत महिलेची ओळख दाराम सुप्रिया अशी झाली असून त्या तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यातील मरीपेडा येथील रहिवासी होत्या.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, सुप्रिया त्यांचे रेस्टॉरंट बंद करून घरी परतत असताना हा अपघात झाला.या अपघातात सुप्रिया यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत कारमध्ये असलेली त्यांची मैत्रीण गंभीर जखमी झाली. ही मैत्रीण तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यातील कोडाड येथील रहिवासी आहे. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेनंतर सुप्रिया यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खम्मममधील नायडू पेटा सर्कलजवळ राहणारे सुप्रिया यांचे वडील डी. श्रीनिवास यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांना पत्र लिहून मुलीचा पार्थिव देह अंत्यसंस्कारासाठी भारतात आणण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी विनंती केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, हा अपघात रात्री सुमारे १ वाजून ४० मिनिटांनी झाला.

सुप्रिया यांच्या नातेवाईकांनी आणि परिचितांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही पोलिस आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला आहे. खम्ममचे पोलीस आयुक्त आणि स्थानिक नेत्यांना टॅग करत कुटुंबीयांनी सुप्रिया यांचा पार्थिव देह लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी तसेच आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, सुप्रिया या त्यांचे पती कोडुमुरी रंजीत यांच्यासोबत मिसुरीतील वेंट्झव्हिल येथे राहत होत्या. सुप्रिया तेथे रेस्टॉरंट चालवत होत्या, तर त्यांचे पती रंजीत सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करतात. या दाम्पत्याचा विवाह सुमारे पाच वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना अडीच वर्षांचा मुलगाही आहे. सुप्रिया यांच्या मृत्यूची माहिती रंजीत यांनी तेलंगणातील दोन्ही कुटुंबांना दिली

Total Visitors :

5468411
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

कोकणची लोककला आणि भजन परंपरा जपणार्‍या निढळेवाडीतील तीन बालगायिकांचा विशेष सन्मान

Gramin Varta
2 Min Read

जाकादेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली नर्सरी व गणपती कारखान्याला क्षेत्रभेट

Gramin Varta
2 Min Read

देवरुख पोलीस ठाण्याच्या राजाला भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरी: आदर्श हायस्कूल कुरतडेच्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

मणिपूरमध्ये पुन्हा जातीय हिंसाचाराचा भडका; दोघांची हत्या

3 Min Read
देश-विदेश

भारतीय महिला क्रिकेटपटू सब्बिनेनी मेघनाची क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्तीची घोषणा

3 Min Read
देश-विदेश

ओबीसी आरक्षणासह 20 जि.प., 211 पं.स. निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

2 Min Read
देश-विदेश

आंदोलनाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी कब्जा अयोग्य- सुप्रीम कोर्ट

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?