ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मुंबई विद्यापीठ विभागीय महिला कबड्डी स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे यश; पटकावले रौप्य पदकासह उपविजेतेपद
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मुंबई विद्यापीठ विभागीय महिला कबड्डी स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे यश; पटकावले रौप्य पदकासह उपविजेतेपद
रत्नागिरी

मुंबई विद्यापीठ विभागीय महिला कबड्डी स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे यश; पटकावले रौप्य पदकासह उपविजेतेपद

Gramin Varta
Last updated: October 7, 2026 8:33 am
Gramin Varta
56 Views
Share

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित कोकण विभाग क्रमांक चारच्या आंतरमहाविद्यालयीन महिला कबड्डी स्पर्धेत रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) महिला संघाने चमकदार कामगिरी करत रौप्य पदकासह उपविजेतेपदावर नाव कोरले आहे. कोकण विभाग आणि ज्ञानदीप कॉलेज ऑफ सायन्स आणि कॉमर्स, भातगाव (खेड) यांच्या संयुक्त विद्यमाने २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ दरम्यान डेरवण येथील एस.व्ही.जे.सी.टी. स्पोर्ट्स कॅम्पसमध्ये या चुरशीच्या स्पर्धा पार पडल्या. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कोकणातील विविध महाविद्यालयांना मागे टाकत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संघाने सन २०२६-२७ चे सांघिक उपविजेतेपद पटकावत द्वितीय क्रमांक संपादन केला.

उपविजेतेपद मिळवणाऱ्या या संघात कर्णधार व खेळाडू म्हणून नंदिनी कोचारे (एम.ए.), बिस्ना थापा, अमिता गावडे, आकांशा भातडे, सानिया शेख (सर्व तृतीय वर्ष कला), मैथिली गावकर, त्रिशा मोहिते, सायली डांगे, प्राची भोंगले (सर्व प्रथम वर्ष वाणिज्य), चंदना वाकडे, सलोनी कांबळे, अपूर्वा गुरव (सर्व प्रथम वर्ष कला) तसेच श्रावणी शेलार आणि श्रावणी शिंदे (दोन्ही द्वितीय वर्ष विज्ञान) या विद्यार्थिनींनी मोलाचे योगदान दिले. संघाला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन तर क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके, श्री. सचिन साळवी आणि श्री. दत्तात्रय किर यांचे सहकार्य लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, तिन्ही शाखांचे उपप्राचार्य, डॉ. विवेक भिडे यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitors :

5470318
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दाभोळ सागरी पोलीस ठाण्याची सूत्रे सहायक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ यांच्या हाती; पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर वचक ठेवण्याचा निर्धार

Gramin Varta
1 Min Read

नवऱ्याने कॅप्सूलमधून खाऊ घातले ब्लेडचे तुकडे; न्यायालयात साक्ष फिरवली तरी नवरा ठरला दोषी

Gramin Varta
3 Min Read

राजापूर: महायुती सरकार शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी; गावागावांत वनराई बंधारे बांधून दुष्काळावर मात करूया : आमदार निलेश राणे

Gramin Varta
2 Min Read

चित्ररुपम स्टुडिओच्या कथा स्पर्धेत १५ कथांची अंतिम फेरीसाठी निवड; ग्रामीण व सामाजिक वास्तवाचे दर्शन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

मिरजोळे येथे वृद्धाचा घरातील शौचालयात आकस्मिक मृत्यू

1 Min Read
रत्नागिरी

विजया आगाशे यांच्या मरणोत्तर दानातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आदर्श

2 Min Read
रत्नागिरी

‘ग्रामीण वार्ता’ची दखल: नाचणे ग्रामपंचायत हद्दीतील ‘तो’ धोकादायक खड्डा २४ तासांत काँक्रीटने बुजवला

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघे ताब्यात; १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?