ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘ग्रामीण वार्ता’ची दखल: नाचणे ग्रामपंचायत हद्दीतील ‘तो’ धोकादायक खड्डा २४ तासांत काँक्रीटने बुजवला
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘ग्रामीण वार्ता’ची दखल: नाचणे ग्रामपंचायत हद्दीतील ‘तो’ धोकादायक खड्डा २४ तासांत काँक्रीटने बुजवला
रत्नागिरी

‘ग्रामीण वार्ता’ची दखल: नाचणे ग्रामपंचायत हद्दीतील ‘तो’ धोकादायक खड्डा २४ तासांत काँक्रीटने बुजवला

Gramin Varta
Last updated: October 3, 2026 8:21 pm
Gramin Varta
173 Views
Share

रत्नागिरी (अजय सावंत): नाचणे ग्रामपंचायत हद्दीतील वर्दळीच्या रस्त्यावरील अपघाताचा गंभीर धोका अखेर टळला असून, ‘ग्रामीण वार्ता’च्या दणक्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने गतिमान पावले उचलत मुख्य वळणावरील जीवघेणा खड्डा काँक्रीटीकरण करून सपाट केला आहे. गणेश कॉलनीकडून सह्याद्री नगरकडे जाताना जनरल स्टोअर्सनजीकच्या पहिल्या डाव्या वळणावरच पडलेला हा खड्डा इतका खोल होता की, समोरून वेगात येणाऱ्या वाहनांना त्याचा अंधारात अथवा वळणावर कोणताही अंदाज येत नव्हता. परिणामी शालेय बस, दुचाकी व चारचाकी वाहनांचा तोल जाऊन मोठ्या अपघाताची भीती सातत्याने व्यक्त होत होती.

या मार्गावरील पादचारी व वाहनचालकांची सुरक्षा धोक्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. या समस्येचे गांभीर्य ओळखून १ ऑक्टोबर रोजी ‘ग्रामीण वार्ता’ने प्रत्यक्ष वस्तुस्थिती मांडणारे वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाला खडबडून जागे केले. या वृत्ताची दखल घेत माजी ग्रामपंचायत सदस्य संकेत कदम यांनी तातडीने ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करून काम मार्गी लावण्याची मागणी लावून धरली. प्रशासनानेही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून २ ऑक्टोबर रोजी संबंधित वळणावरील मुख्य खड्ड्यासह परिसरातील अन्य खड्ड्यांवर सिमेंट काँक्रीटचा मुलामा देऊन रस्ता पूर्ववत वाहतूकयोग्य केला. दुर्घटनेची वाट न पाहता समस्येला वाचा फोडल्याबद्दल नागरिकांनी ‘ग्रामीण वार्ता’प्रती कृतज्ञता व्यक्त केली असून, अवघ्या दुसऱ्याच दिवशी कामाची पूर्तता केल्याबद्दल नाचणे ग्रामपंचायतीच्या तत्पर कारभारावरही समाधानाची मोहोर उमटली आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

पडिक पाण्याच्या टाकीत अडकलेल्या मगरीच्या पिल्लाची सुटका

Gramin Varta
1 Min Read

शिपाई पदाची भरती प्रक्रिया रखडली; अंतिम मुदतीनंतर ६८ दिवस उलटूनही नियुक्ती नाही

Gramin Varta
2 Min Read

वनप्लसचा बजेट स्मार्टफोन ‘एन६ लाइट ४जी’ लाँच

Gramin Varta
3 Min Read

राजापूर : आडिवऱ्यात नवरात्रोत्सवानिमित्त राज्यस्तरीय सोलो व ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

कर्णकर्कश फटाका सायलेंसर दुचाकींवर कारवाईचा बडगा; बेकायदा विक्रेतेही पोलिसांच्या रडारवर, थेट जप्तीचे पोलीस अधीक्षकांचे आदेश

2 Min Read
रत्नागिरी

वाटद एमआयडीसीतील डिफेन्स क्लस्टरचा पुनर्विचार होणार

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या संशयिताला ३ दिवसांची पोलीस कोठडी

1 Min Read
रत्नागिरी

ब्रेकिंग: रत्नागिरीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचा चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?