ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर: मुंबई-गोवा महामार्गावर मद्यधुंद कारचालकाची दुचाकीला जोरदार धडक; बँक कर्मचारी जखमी, गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर: मुंबई-गोवा महामार्गावर मद्यधुंद कारचालकाची दुचाकीला जोरदार धडक; बँक कर्मचारी जखमी, गुन्हा दाखल
राजापूर

राजापूर: मुंबई-गोवा महामार्गावर मद्यधुंद कारचालकाची दुचाकीला जोरदार धडक; बँक कर्मचारी जखमी, गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: October 9, 2026 4:04 pm
Gramin Varta
1k Views
Share

राजापूर: मुंबई-गोवा महामार्गावर ओणी नजीकच्या गगनगिरी महाराज आश्रमाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मद्यधुंद स्विफ्ट कारचालकाने पुढे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला, तर दुचाकी सुमारे १५ ते २० मीटर फरफटत जाऊन कारच्या बोनेटखाली चिरडली गेली. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी कारचालकाविरोधात भारतीय न्याय संहितेसह मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.

रत्नागिरी तालुक्यातील चिंचखरी येथील रहिवासी शुभम आत्माराम बोरकर (वय २७) हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या होमलोन विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी बँकेच्या कामकाजानिमित्त ते आपल्या ॲक्टिव्हा दुचाकीने (क्र. एम.एच. ०८ ए.एम. ४२२४) राजापूर शाखेतील काम आटोपून लांजा शाखेकडे निघाले होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गाने जात असताना खरवते गावच्या हद्दीत गोव्याकडून भरधाव वेगात आलेल्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारने (क्र. एम.एच. ०८ बी.ई. ३४६९) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की शुभम बोरकर हे उडून रस्त्याच्या बाजूला गवतात पडले, तर स्विफ्ट कारचालकाने दुचाकीला सुमारे १५ ते २० मीटर फरफटत नेत महामार्गाच्या डाव्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीवर नेऊन आदळले. यात दुचाकी कारच्या पुढील भागाखाली अडकून अक्षरशः चेपली गेली.

अपघातानंतर महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिक प्रज्योत खानविलकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी बोरकर यांना सावरले. नागरिकांनी कारचालकाला वाहनातून बाहेर काढले असता तो दारूच्या नशेत धुंद असल्याचे आणि त्याला धड बोलताही येत नसल्याचे स्पष्ट झाले. आर्यन किशोर ढबले (वय २४, रा. वॉर्ड नं. १, वायफड, जि. वर्धा) असे या संशयित कारचालकाचे नाव असून त्याने ही कार रत्नागिरी येथून भाड्याने घेतल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी शुभम बोरकर यांना तातडीने राजापूर येथील जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित चालक आर्यन ढबले याची ब्रेथ ॲनालायझर मशिनद्वारे तपासणी केली असता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी शुभम बोरकर यांच्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २६६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून राजापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5469285
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

साखरप्यात श्री जुगाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Gramin Varta
1 Min Read

महाराष्ट्राच्या लोककलेचा तेजस्वी तारा निखळला; ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन

Gramin Varta
2 Min Read

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; महानगरी, जनशताब्दी आणि प्रगतीसह १८ गाड्यांचा ‘सुपरफास्ट’ दर्जा रद्द, १ जानेवारी २०२७ पासून धावणार नव्या क्रमांकाने

Gramin Varta
2 Min Read

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्यासाठी मुंबईत सीजेपीचे ‘जेलभरो’ आंदोलन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

गगनगिरी गडावर रायपाटणच्या श्वेता इस्कारची १८ तासांची अनोखी रांगोळी साधना

2 Min Read
राजापूर

पोलीस स्मृतिदिनानिमित्त रायपाटणच्या जिजामाता विद्या मंदिरात निबंध स्पर्धा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

2 Min Read
राजापूर

राजापुरात बंद घर फोडून ६७ हजारांचा ऐवज लंपास

1 Min Read
राजापूर

जामदा धरण मोबदला घोटाळा: अस्तित्वात नसलेली झाडे दाखवून शासकीय निधी लाटल्याचा मनसेचा गंभीर आरोप; राजापूर पोलिसांत तक्रार दाखल

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?