ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दिल्लीतील मेट्रो आणि वाहतूक निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दिल्लीतील मेट्रो आणि वाहतूक निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी
देश-विदेश

दिल्लीतील मेट्रो आणि वाहतूक निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

Gramin Varta
Last updated: October 10, 2026 8:12 am
Gramin Varta
52 Views
Share

निर्बंधांचा तातडीने आढावा घेण्याचे दिले निर्देश

दिल्ली: दिल्लीत शनिवारी 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानके बंद करणे, रस्त्यांवर बॅरिकेडिंग करणे आणि रेल्वे वाहतुकीवर निर्बंध घालण्याच्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कायदा आणि सुव्यवस्था राखणे आवश्यक असले, तरी त्यासाठी सामान्य नागरिकांच्या वाहतुकीवर पूर्णपणे निर्बंध घालणे योग्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव विविध निर्बंध लागू केले आहेत. मात्र, या निर्बंधांमुळे सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मेट्रो स्थानके बंद करण्याच्या आणि वाहतुकीवर निर्बंध लादण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची असली, तरी त्यासाठी नागरिकांची दैनंदिन वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होता कामा नये, असे न्यायालयाने नमूद केले.

गुरुग्राम, ग्रेटर नोएडा तसेच दिल्लीच्या इतर भागांतून प्रवास करणारे विद्यार्थी, कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावर या निर्बंधांचा परिणाम होत असल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले. प्रत्येकाकडे खासगी वाहन नसते, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे रोखता येणार नाही, असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले.न्यायालयाने बंद करण्यात आलेल्या मेट्रो स्थानकांची संख्या कमी करण्यास आणि लागू केलेल्या निर्बंधांचा तातडीने आढावा घेण्यास सांगितले. तसेच, आंदोलनापूर्वी दिल्लीतील रेल्वे सेवा आणि मेट्रो वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार नाही, याची खात्री करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले.

मेट्रो सेवा पूर्णपणे बंद ठेवता येणार नाही

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, मेट्रो रेल्वेच्या संचालनावर संपूर्ण बंदी घालता येणार नाही. शहराच्या विविध भागांतून प्रवास करणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीपासून वंचित ठेवणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था राखताना सामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5470197
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

कर्णकर्कश फटाका सायलेंसर दुचाकींवर कारवाईचा बडगा; बेकायदा विक्रेतेही पोलिसांच्या रडारवर, थेट जप्तीचे पोलीस अधीक्षकांचे आदेश

Gramin Varta
2 Min Read

पाली येथे भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

Gramin Varta
2 Min Read

जयगड मार्गावर खड्डा चुकवताना भीषण अपघातात दोघे जखमी, चालकावर ४ महिन्यांनी गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

एसआयआरच्या मुद्द्यावरून ४ ऑक्टोबरला मुंबईत राज आणि उद्धव ठाकरेंचा संयुक्त जनमोर्चा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

आयटीबीपीच्या जवानांनी सर केले ‘माऊंट-एबी’ शिखर;तब्बल 24,131 फुटांवर रोवला

2 Min Read
देश-विदेश

आयसीसीकडून २०२७ विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, १० ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना

3 Min Read
देश-विदेश

सीजेपीचे तरुणांना शांततापूर्ण आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन

2 Min Read
देश-विदेश

निवडणूक आयोगाकडून एसआयआरचा बचाव, अनियमिततेचे आरोप फेटाळले

6 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?