ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दापोली : शेवग्याच्या फांद्या तोडताना कंपाऊंडवरून पडून वृद्धाचा मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दापोली : शेवग्याच्या फांद्या तोडताना कंपाऊंडवरून पडून वृद्धाचा मृत्यू
दापोली

दापोली : शेवग्याच्या फांद्या तोडताना कंपाऊंडवरून पडून वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
Last updated: October 12, 2026 3:42 pm
Gramin Varta
54 Views
Share

दापोली : घराशेजारील झाडाच्या फांद्या छाटताना आठ फूट उंच कंपाऊंडच्या भिंतीवरून तोल जाऊन खाली फरशीवर कोसळल्याने ६८ वर्षीय वृद्धाचा जागीच गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गंधर्वनगरी येथे घडली आहे. प्रदीप राजाराम शिगवण (वय ६८, रा. गंधर्वनगरी, ता. दापोली) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप शिगवण हे रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास आपल्या घराच्या बाजूला असलेल्या सुमारे आठ फूट उंचीच्या वॉल कंपाऊंडच्या भिंतीवर चढून शेवग्याच्या झाडाच्या फांद्या तोडत होते. झाडाच्या फांद्या छाटत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते शेजारी राहणारे सागर गजानन वरवटकर यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या लादी बसविलेल्या पक्क्या अंगणात जोराने आदळले. उंचीवरून थेट फरशीवर पडल्याने त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर मार लागून नाकातोंडातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी त्यांना तात्काळ उपचारांसाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणीअंती उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात दुपारी पावणेतीन वाजता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ७६/२०२६ अशी करण्यात आली असून, या दुर्दैवी घटनेमुळे गंधर्वनगरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दापोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5468457
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दापोलीतील लाडघर-कर्दे पर्यटन मार्गाची चाळण; खड्डे आणि उखडलेल्या खडीमुळे पर्यटकांसह व्यावसायिक हैराण

Gramin Varta
1 Min Read

चिपळूणात संशयास्पदरीत्या मोटारसायकल चालविणारा तरुण ताब्यात; ५० हजारांची दुचाकी जप्त

Gramin Varta
1 Min Read

मनोज जरांगेंनी ५०० कोटींचा आरोप सिद्ध करून दाखवावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आव्हान

Gramin Varta
2 Min Read

जयगड : दुचाकी कठड्याला धडकून दरीत कोसळली; अपघातात चालकाचा मृत्यू, दोन तरुण जखमी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

दापोली

दापोलीत मटका जुगारावर रत्नागिरी एलसीबीचा छापा; मुद्देमालासह एकावर गुन्हा दाखल

1 Min Read
दापोली

कोकणच्या सुपुत्राची हिमालयात सायकल स्वारी; दापोलीच्या अभिजित मयेकर यांची ४०० किमीची सोलो मोहीम यशस्वी

2 Min Read
दापोली

दुष्काळग्रस्त बळीराजाला हेक्टरी ५० हजारांची तातडीची मदत द्या; भारतीय किसान संघाची दापोली तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

2 Min Read
दापोली

हर्णे समुद्रकिनाऱ्यावर आढळला वैशिष्ट्यपूर्ण ‘बॉम्बे डोरिड स्लग

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?