ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: हर्णे समुद्रकिनाऱ्यावर आढळला वैशिष्ट्यपूर्ण ‘बॉम्बे डोरिड स्लग
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » हर्णे समुद्रकिनाऱ्यावर आढळला वैशिष्ट्यपूर्ण ‘बॉम्बे डोरिड स्लग
दापोली

हर्णे समुद्रकिनाऱ्यावर आढळला वैशिष्ट्यपूर्ण ‘बॉम्बे डोरिड स्लग

Gramin Varta
Last updated: October 19, 2026 9:02 am
Gramin Varta
73 Views
Share

सागरी जैवविविधतेच्या अभ्यासक फहाद जमादारांनी घेतली महत्त्वपूर्ण नोंद

दापोली:  दापोली तालुक्याला लाभलेली विस्तीर्ण किनारपट्टी ही सागरी परिसंस्थेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध मानली जाते, याची प्रचिती हर्णे येथील समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा एकदा आली आहे. हर्णे किनारपट्टीवर सागरी जीवांचा शोध व नियमित निरीक्षण करत असताना सागरी जैवविविधतेचे अभ्यासक फहाद जमादार यांना ‘बॉम्बे डोरिड स्लग’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्यंत लक्षवेधी व वैशिष्ट्यपूर्ण अपृष्ठवंशी सागरी जीवाचे दर्शन घडले आहे.

समुद्रकिनाऱ्यावरील खडकाळ भाग, भरती-ओहोटीचा पट्टा आणि इतर सागरी अधिवासांमध्ये विविध प्रकारचे सूक्ष्म तसेच वैशिष्ट्यपूर्ण जीव वास्तव्यास असतात. त्यापैकी ‘समुद्री स्लग’ हा विशेष लक्षवेधी जीव असून, जेएनके मरिन ॲक्वा लाईफच्या माध्यमातून सागरी जीव, त्यांचे नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधता संवर्धनाशी संबंधित क्षेत्रीय कार्य करणारे अभ्यासक फहाद जमादार यांच्या नियमित किनारपट्टी निरीक्षणादरम्यान हा जीव कॅमेऱ्यात टिपला गेला. अशा दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण जीवांची नोंद ठेवणे, त्यांची छायाचित्रे घेणे आणि अधिवासाविषयी माहिती संकलित करणे हे सागरी जैवविविधतेच्या सखोल अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

हर्णे भागातील खडकाळ किनारे आणि भरती-ओहोटीची वैशिष्ट्यपूर्ण रचना विविध प्रकारच्या सागरी जीवांना पोषक अधिवास उपलब्ध करून देत असून, अशा क्षेत्रांचे सातत्याने निरीक्षण केल्यास परिसरातील सागरी प्रजातींची संपन्नता आणि त्यांच्या अधिवासाची वस्तुस्थिती समजण्यास मोठी मदत होते. या महत्त्वपूर्ण नोंदीच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना पर्यटन व्यावसायिक अभिजीत भोंगले यांनी स्पष्ट केले की, अशा सागरी जीवांचे निरीक्षण करताना त्यांना हाताळणे, त्यांच्या शरीराला इजा पोहोचवणे किंवा नैसर्गिक अधिवासातून बाहेर काढणे पूर्णपणे टाळले पाहिजे; तसेच समुद्रकिनारा प्लास्टिक व इतर कचऱ्यापासून स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अभ्यासक फहाद जमादार यांनी नोंदवलेला हा दुर्मीळ जीव हर्णे किनारपट्टीवरील सागरी जीवसृष्टीच्या पुढील अभ्यासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरू शकतो, असा विश्वासही यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे.

Total Visitors :

5469381
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

अलोरे येथील कोळकेवाडी धरण व्यवस्थापन गोदामातून अ‍ॅल्युमिनिअम पत्रे व लोखंडी पाईप लंपास; एकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

साखरपा बसस्थानकात एसटीच्या चाकाखाली तरुण सापडला; पायावरून चाक गेले

Gramin Varta
1 Min Read

खेड: पत्नीच्या निधनानंतर मानसिक तणावात असलेल्या प्रौढाचा खाडीत आढळला मृतदेह

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरी : कोकण नगरमधून मतिमंद तरुणाचे अपहरण; शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

दापोली

दापोलीत लहरी पावसामुळे बळीराजाची धांदल; भातपिकाचे नुकसान टाळण्यासाठी उडव्यांवर प्लास्टिकचे आवरण

1 Min Read
दापोली

दापोलीच्या मातीतल्या शुभम लोंढेची राष्ट्रीय स्तरावर धडक; पॉवरलिफ्टिंगमध्ये दुहेरी रौप्यपदक पटकावत उंचावला महाराष्ट्राचा झेंडा

2 Min Read
दापोली

किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त २२ वर्षीय तरुणीचा दापोलीत उपचारादरम्यान मृत्यू

2 Min Read
दापोली

दापोलीतील तीन प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी जनआक्रोश; हिवाळी अधिवेशनात निर्णय घेण्याची युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघाची हाक

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?