ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मुंबई-गोवा महामार्गासह प्रमुख मार्गांवर सुरू होणार ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा; अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार जीवनदान
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मुंबई-गोवा महामार्गासह प्रमुख मार्गांवर सुरू होणार ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा; अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार जीवनदान
कोकण

मुंबई-गोवा महामार्गासह प्रमुख मार्गांवर सुरू होणार ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा; अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार जीवनदान

Gramin Varta
Last updated: October 14, 2026 9:09 am
Gramin Varta
70 Views
Share

मुंबई : राज्यातील महामार्गांवर घडणाऱ्या भीषण रस्ते अपघातांत गंभीर जखमी होणाऱ्या प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी आणि त्यांना अतिमहत्त्वाच्या ‘गोल्डन अवर’मध्ये तत्काळ वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी राज्य शासन लवकरच ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करणार आहे. अपघातानंतरचा पहिला तास म्हणजेच गोल्डन अवर हा जखमींच्या जीवनमरणाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरतो, त्यामुळे या वेळेत रुग्णांना विनाविलंब अद्ययावत ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचवण्यासाठी हवाई रुग्णवाहिका ही प्रभावी ठरेल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही जीवनदायी सेवा प्रत्यक्ष सुरू करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करून मंजुरी घेतली जाणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची अंतिम मंजुरी मिळवून निविदा प्रक्रिया राबवली जाईल. राज्यात दरवर्षी साधारणपणे १५ हजार रस्ते अपघात घडतात, ज्यामध्ये वाहतूक कोंडी आणि दूरवर असणारी रुग्णालये यामुळे जखमींना वेळेवर उपचार मिळणे मोठे आव्हान ठरत होते. हे आव्हान मोडीत काढण्यासाठी पहिल्या टप्प्यात मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्ग या अतिसंवेदनशील मार्गांवर ही यंत्रणा सज्ज केली जाणार आहे.

ही अत्याधुनिक सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणेत चोख समन्वय साधला जाणार आहे. याअंतर्गत सक्षम ट्रॉमा केअर सेंटरचे जाळे, सेवा पुरवठादारांचे पॅनेल, रस्ता सुरक्षा निधीतून आर्थिक तरतूद आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात आला आहे. अपघातातील प्रत्येक जीव अत्यंत अनमोल असून केवळ उपचारांना होणाऱ्या विलंबामुळे कोणाचाही मृत्यू होऊ नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन रस्ते अपघातातील मृत्यूदर रोखण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची भूमिका या वेळी स्पष्ट करण्यात आली.

Total Visitors :

5470248
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लेखिका सविता कोकजे यांच्या ‘गुलदस्ता’ पुस्तकाचे प्रकाशन

Gramin Varta
2 Min Read

चिपळूण: पोफळी येथे २३ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या

Gramin Varta
1 Min Read

लांजा: गोळवशीच्या स्वरा जोगळेची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड; ग्रामस्थांकडून सत्कार

Gramin Varta
1 Min Read

खेड: कळंबणी बुद्रुक येथे बंद घराची खिडकी फोडून घरफोडी; टीव्हीसह स्वयंपाकाची भांडी पळवली

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

कोकण

जनशताब्दीच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात दोन तासांपासून रेल्वे रखडली

1 Min Read
कोकण

देवगडमध्ये अवैध पर्ससीन मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाचा दणका; रत्नागिरीची नौका जप्त

2 Min Read
कोकण

मुंबई-गोवा महामार्ग १७ वर्षांनंतरही रखडलेलाच; खर्च ५,५०० कोटींनी वाढून १६,९०९ कोटींवर

4 Min Read
कोकण

रायगड- भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?