ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: नवव्या पिढीकडून आंग्रे घराण्याचा शस्त्रपूजन वारसा पुढे
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » नवव्या पिढीकडून आंग्रे घराण्याचा शस्त्रपूजन वारसा पुढे
कोकण

नवव्या पिढीकडून आंग्रे घराण्याचा शस्त्रपूजन वारसा पुढे

Gramin Varta
Last updated: October 21, 2026 10:27 am
Gramin Varta
167 Views
Share

रायगड : मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या घराण्यातील साडेतीनशे वर्षांहून अधिक काळाची विजयादशमी आणि शस्त्रपूजनाची परंपरा आजही जपली जात आहे. कान्होजीराजे आंग्रे यांच्या नवव्या पिढीतील वंशज सरखेल रघुजीराजे आंग्रे यांनी घेरिया येथील निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन केले.

सायंकाळी सीमोल्लंघन आणि सोने लुटण्याचा कार्यक्रमही पार पडला.

या वेळी रघुजीराजे आंग्रे यांच्या पत्नी, चिरंजीव आर्यमान व जयार्जुन आणि कन्या गायत्री उपस्थित होते. शस्त्रपूजनात कान्होजीराजे आंग्रे यांच्या वापरातील धोप, तलवारी, दांडपट्टे, गुर्ज, कट्यारी, भाले, जांबिये, परशू, गुप्त्या आणि ढाली यांसारख्या ऐतिहासिक शस्त्रांचा समावेश होता. व्यायामासाठी वापरल्या जाणाऱ्या मुद्गलांसह परवाना प्राप्त आधुनिक अग्निशस्त्रांचेही पूजन करण्यात आले.

कान्होजीराजे आंग्रे यांच्या युद्धातील वापरातील ‘तोफ’ नावाची तलवार विशेष आकर्षण ठरते. दमास्कस पोलादापासून बनविलेल्या या तलवारीचे वजन सुमारे पाच किलो ३०० ग्रॅम असून, लांबी ४० इंच असल्याचे सांगितले जाते. सोन्याची मूठ असलेल्या औपचारिक तलवारीचाही या परंपरेत समावेश आहे.

सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्यासह सेखोजी, संभाजी आणि तुळाजी आंग्रे यांनी मराठा आरमाराच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. विजयादशमीला शस्त्रपूजन करण्याची परंपरा या ऐतिहासिक शौर्याची आठवण करून देते.

पूर्वजांचा पराक्रम, मराठा आरमाराचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही परंपरा जतन करत असल्याचे रघुजीराजे आंग्रे यांनी सांगितले.

Total Visitors :

5468436
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

परतीच्या पावसाचे दाभोळे परिसरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार आगमन; उकाड्यापासून आराम पण शेतकरी चिंतेत

Gramin Varta
1 Min Read

संगमेश्वर : सांभाळ करावा लागतो म्हणून ९१ वर्षांच्या वृद्धेला बांबूने बेदम मारहाण;  नायरीतील महिलेवर गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

देवरूख-मार्लेश्वर मार्गावरील डंपरच्या सुसाट वेगाला बसणार वेसण; बेदरकार चालकांवर देवरूख पोलिसांची करडी नजर, पोलीस निरीक्षकांकडून कडक सूचना

Gramin Varta
2 Min Read

रत्‍नागिरीतील तरुणाचा ओमानमध्ये विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

कोकण

रायगडमध्ये बांबू उद्योगाचे नवे मॉडेल; अडीच एकर लागवडीसाठी सात लाखांचे अनुदान

2 Min Read
कोकण

मुंबई-गोवा महामार्गावरील बेकायदा उभ्या अवजड वाहनांमुळे कुडाळच्या तरुणाचा बळी

2 Min Read
कोकण

महाड एमआयडीसी परिसर हादरला;सिनर्जीया केमिकल कंपनीत रिॲक्टरचा भीषण स्फोट

1 Min Read
कोकण

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?