ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दुष्काळाच्या सावटात कडवई धरणाला लागलेली गळती कायम; लाखो रुपयांचा खर्च निष्फळ ठरल्याने पाणीटंचाईची भीती
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दुष्काळाच्या सावटात कडवई धरणाला लागलेली गळती कायम; लाखो रुपयांचा खर्च निष्फळ ठरल्याने पाणीटंचाईची भीती
संगमेश्वर

दुष्काळाच्या सावटात कडवई धरणाला लागलेली गळती कायम; लाखो रुपयांचा खर्च निष्फळ ठरल्याने पाणीटंचाईची भीती

Gramin Varta
Last updated: October 23, 2026 9:54 am
Gramin Varta
69 Views
Share

संगमेश्वर: दक्षिण रत्नागिरी लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील कडवई धरणाच्या मुख्य भिंतीतून आणि सांडव्याच्या भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय सुरू असल्याने परिसरात तीव्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीत ही गळती वेळीच न रोखल्यास कडवईसह आसपासच्या भागाला भीषण पाणीटंचाईचा तडाखा बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सुमारे ५० वर्षांपासून परिसरातील विहिरींची भूजल पातळी टिकवून ठेवणारे आणि ५.५० चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र लाभलेले हे धरण गावासाठी जीवनवाहिनी मानले जाते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून भिंत व सांडव्याला लागलेली गळती बंद करण्यासाठी लाखो रुपयांच्या निविदा काढून दुरुस्तीकामे करूनही समस्येवर अद्याप मात करता आलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक व्यक्त करत आहेत.

अपुऱ्या पावसामुळे पाणीसाठ्यात आधीच घट झालेली असताना सांडव्याभोवती वाढलेल्या दाट झाडीझुडपांमुळे नेमका किती विसर्ग सुरू आहे याचा अंदाज बांधणेही कठीण झाले आहे. या गंभीर विषयावर नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी आवाज उठवत तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी लावून धरली. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना अधिकृत लेखी निवेदन सादर केल्याची माहिती ग्रामाधिकारी राहुलकुमार चौधरी यांनी दिली. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी गळती रोखण्यासाठी झालेले प्रयत्न अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरले नसल्याची कबुली पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता चंद्रकांत धामापूरकर यांनी दिली आहे. धरणातून विसर्ग सुरू असला तरी सद्यस्थितीत गावात तीव्र टंचाई भासणार नाही, मात्र पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागेल आणि सांडव्यावरील झाडी तातडीने हटवली जाईल, असा दावा त्यांनी केला. तरीही, पावसाअभावी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसताना बहुमूल्य पाणी असेच वाहून गेले तर उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागेल, त्यामुळे प्रशासनाने वेळकाढूपणा न करता तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

Total Visitors :

5469327
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

साडवलीत युवासेनेच्या पुढाकाराने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न; ६० हून अधिक रुग्णांची तपासणी

Gramin Varta
2 Min Read

मिरकरवाडा जेटीवर चक्कर येऊन पडलेल्या २० वर्षीय नेपाळी तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ; खेडमध्ये २० कोटींचा ‘उमेद मॉल’ उभारणार – राज्यमंत्री योगेश कदम

Gramin Varta
3 Min Read

अन्न व औषध प्रशासनाचा दणका; जिल्ह्यातील २३ आस्थापनांचे परवाने निलंबित, त्रुटींची पूर्तता केल्यानंतर १६ दुकानांचे शटर पुन्हा उघडले

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

संगमेश्वरच्या चार एक्सप्रेससाठी ‘उंदीरमामा’ मैदानात!

1 Min Read
संगमेश्वर

देवरूख-मार्लेश्वर मार्गावर डंपर पलटी; निवेखुर्द येथील अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक

1 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर पोलीस ठाण्यात नवरात्रोत्सवानिमित्त कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांचा गौरव

1 Min Read
संगमेश्वर

मार्लेश्वर मार्गावर चिखलाचे साम्राज्य ; दसऱ्याच्या मुहूर्तावर पर्यटकांसह भाविक रस्त्यातच अडकले

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?